कोडरमा : महिलाही आता पुरुषांच्या बरोबरीने आपले अस्तित्त्व सिद्ध करुन दाखवत आहेत. आज एका महिलांच्या ग्रुपची कहाणी तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांना एकेकाळी 10-20 रुपयांसाठी आपल्या पतीवर अवलंबून राहावे लागायचे. आता याच महिला आठवड्याला 2 हजार रुपये कमावत आहेत. या महिलांचे आयुष्यच आता बदलून गेले आहे.
कोडरमा येथील इंदरवा येथील महिलांची ही कहाणी आहे. आज स्वयंरोजगाराच्या माध्यमातून या महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. घरातील कामे आटोपल्यावर उरलेल्या वेळेत महिला बांबूचे पदार्थ बनवून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. यामुळे या महिला आता आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत आहेत. तसेच स्वतःचा खर्चही भागवू शकत आहेत.
advertisement
पती बीटेक, तर पत्नी एमबीए, नोकरी करता-करता क्यूट कपलनं सुरू केलं स्टार्टअप, नावही यूनिक
लोकल18 च्या टीमने या महिलांशी संवाद साधला. यावेळी इंदरवा येथील झरीटांड गंगा बांबू कला केंद्र महिला समूहाच्या सदस्या सुमित्रा देवी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पूर्वी गावातील स्त्रिया बांबूपासून पारंपारिक टोपल्या, सुपडे आणि इतर वस्तू तयार करत असत. याची बाजारात हंगामी मागणी होती. त्यामुळे महिलांना कोणतीही लक्षणीय बचत करता येत नव्हती.
या दरम्यान, ग्रामीण जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी काम करणाऱ्या हँड इन हँड इंडिया या सामाजिक संस्थेने महिला गटाला 7 दिवसांचे मोफत विशेष प्रशिक्षण दिले. यामध्ये महिलांनी एका बांबूपासून कमी वेळात अधिक उत्पादने सुरक्षित पद्धतीने तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले.
त्यांनी सांगितले की, प्रशिक्षण घेतल्यानंतर आता गटातील 20 महिला बांबूच्या फुलदाण्या, पेन स्टँड, फ्लॉवर पॉट, डस्टबीन यासह अनेक सजावटीच्या वस्तू बनवत आहेत. तसेच यातून प्रत्येक महिलेला आठवड्याला सुमारे 2 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
मेहनत करुनही आयुष्यात यश मिळेना... नेमकं काय करावं, ही माहिती करेल तुम्हाला नक्की मदत
त्यांनी पुढे सांगितले की, समूहाद्वारा तयार केलेल्या या बांबूच्या उत्पादनांची डोमचांच आणि तिलैया बाजारात विक्री होते. तसेच काही वस्तू या हँड इन हँड इंडिया संस्थेच्या माध्यमातून बिहारमध्ये विक्री होत आहे. समूहाच्या माध्यमातून लोकांच्या गरजेनुसार, लहान मोठ्या आकाराचा सामान तयार करण्याचीही सुविधा दिली जात असल्याचे त्या म्हणाल्या.