जमुई : सध्या अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक 10 वर्षांच्या मुलाची आई असलेली महिला एका ठेलेवाल्याच्या प्रेमात पडली आणि यानंतर या महिलेने एक नव्हे तर दोन वेळा आपल्या प्रियकरासोबत पळून गेली.
ही घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यातील अलीगंज परिसरात समोर आला आहे. याठिकाणी एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्लान केला. शंकर कुमार राम मजूरी करुन आपल्या कुटुंबीयांचे पालन पोषण करतो. नेहमीप्रमाणे तो मजूरी करायला गेला आणि घरी परतल्यावर त्याने पाहिले असता त्याची पत्नी घरी नव्हती.
advertisement
नूतन देवी असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. नूतनचे वय 30 वर्षे आहे. त्याने तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली. ती तिच्यापेक्षा कमी वयाच्या प्रियकर विशाल कुमार याच्यासोबत फरार झाली. यानंतर तिने आपल्या सासूला फोन केला आणि सांगितले की, ती आपल्या प्रियकरासोबत लग्न करणार आहे आणि त्याच्या सोबतच राहणार आहे. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करु नये.
लग्नाचा 50वा वाढदिवस, अन् नातवंडांनी धूमधडाक्यात लावलं आजी आजोबाचं लग्न, पुण्यातील अनोखा लग्नसोहळा
दुसऱ्यांदा ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली -
नूतन देवी ही 6 महिन्यांपूर्वी गया येथे आपल्या नातेवाईकांच्या इथे लग्नाला गेली होती. तिथे फिरताना एका ठेलेवाल्यासोबत तिची नजरानजर झाली. दोघांमध्ये संवाद झाला. यानंतर या संवादाचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर मोबाईलवर संवाद होऊ लागला. याच दरम्यान, 4 महिन्यांपूर्वी ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र, पोलिसांत प्रकरण गेल्यावर पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि प्रियकर प्रेयसीला ताब्यात घेतले आणि प्रेयसी नूतन देवी हिला तिच्या पतीसोबत पाठवले. मात्र, आता दुसऱ्यांदा ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. चंद्रदीप पोलीस ठाण्याचे प्रमुख राजेंद्र साह यांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. या घटनेची परिसरात मोठी चर्चा होत आहे.