ॲडव्हेंचर बाईकसाठी आता बाहेर जायची गरज नाही, कोल्हापुरात मिळतेय ही सुविधा, तरुणाने बनवला भन्नाट STUDIO

Last Updated:

जेव्हा बाईक रिस्टोरेशन आणि मॉडिफिकेशनमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा या सगळ्या गोष्टी आल्हाद आधीपासून घरातच करत होता. मात्र, लोकांना आपलं काम दिसलं पाहिजे, असे वाटत असल्यामुळे एक डिझाईन स्टुडिओ सुरू करण्याची कल्पना आली होती.

+
ॲडव्हेंचर

ॲडव्हेंचर बाईक बॉडी पार्ट्स कोल्हापूर

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : कोणत्याही ॲडव्हेंचर बाईकसाठी जादाचे बॉडी पार्ट्स हे हमखास लागतात. मात्र, बऱ्याचदा हे पार्ट्स एकतर मिळत नाहीत किंवा चांगल्या प्रतीचे नसतात. त्यामुळेच कोल्हापूरच्या एका तरुणाने यावर उपाय शोधून स्वतःचा एक बाईक मोडिफिकेशन स्टुडीओ सुरू केला आहे. विशेष म्हणजे या स्टुडीओमध्ये तो वेगवेगळ्या बाईकना बसणारे ॲसेसरिज आणि बॉडी पार्ट्स स्वतःच नव्याने डीझाईन करुन बनवतो.
advertisement
कोल्हापूरच्या या बाईकवेड्या तरुणाचे नाव आल्हाद देशपांडे असे आहे. नुकताच त्याने स्वतःचा बाईक डिझाईन आणि मॉडिफिकेशनसाठी एक शोरुम सुरू केले आहे. याच ठिकाणी स्पेशली त्याने बनवलेल्या काही बाईकच्या ॲसेसरीज देखील विकतो. खरंतर आल्हादला दहावीनंतरच बाईक मॉडिफिकेशन आणि रिस्टोरेशनमध्ये रुची होती. त्यामुळे पहिली बाईक त्याने स्वतः दहावीनंतरच बनवली होती.
advertisement
तसेच त्यानंतर त्याने जवळपास अजून 10-15 बाईक मॉडीफाय केल्या होत्या. बाईक रेस्टॉरेशनमध्येही माहिती घेऊन एक राजदूत गाडी रिस्टोर केली होती. इंजिन बंद पडलेली, बरेचसे पार्टस् नसलेली अशी ती गाडी पूर्णपणे भंगारमध्येच होती. पण रिस्टोरेशननंतर आता ती गाडी चालू स्थितीत आहे, असे आल्हाद सांगतो.
म्हणून सुरू केला असा स्टुडिओ -
जेव्हा बाईक रिस्टोरेशन आणि मॉडिफिकेशनमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा या सगळ्या गोष्टी आल्हाद आधीपासून घरातच करत होता. मात्र, लोकांना आपलं काम दिसलं पाहिजे, असे वाटत असल्यामुळे एक डिझाईन स्टुडिओ सुरू करण्याची कल्पना आली होती. मात्र, फक्त एक डिजाईन स्टुडिओ न राखता एक डिटेलिंग स्टुडिओही त्याने बनवला. त्यातूनच या स्टुडिओची सुरुवात झाली. साधारणपणे 2019 सालीच याची कल्पना डोक्यात होती. मात्र, 2020 साली कोरोना महामारी आणि इतर काही कारणांमुळे ती कल्पना सत्यात उतरवता आली नाही. पण शेवटी 2024 मध्ये नव्या जोमात या स्टुडिओची सुरुवात केली असल्याचे आल्हाद सांगतो.
advertisement
स्टुडिओमध्ये चालते हे सर्व काम -
या स्टुडिओमध्ये चार चाकी गाड्यांचे फोम वॉशिंग, पॉलिशिंग, सिरॅमिक कोटिंग, इंटिरियर डीप क्लीनिंग, पीपीएफ, इंजिन क्लिनिंग अशा अनेक सुविधा दिल्या जातात. तर दुचाकी गाड्यांसाठी देखील पॉलिशिंग, फोम वॉशिंग, बाईक डीप क्लीनिंग अशा सुविधा दिल्या जातात. तर बाईकच्या स्पेशल ॲक्सेसरीज हा आमचे मुख्य लक्ष आहे. बाईकसाठी लागणाऱ्या विविध ॲसेसरीज बनवण्यासाठी थ्रीडी प्रिंटरचा वापर करून स्वतः डिझाईन केलेले काही बाईकचे पार्ट्स या स्टुडिओमध्ये बसवले जातात. ते पार्ट्स बाईकवर टेस्ट करूनच मग ते लोकली बनवून घेतले जातात. हे पार्ट्स ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने विकले जातात, अशी आपल्या स्टडियोची खासियत असल्याची माहिती आल्हादने दिली.
advertisement
अशा बनवल्या जातात ॲसेसरीज आणि पार्ट्स -
कोणत्याही अडव्हेंचर बाईकसाठी ॲसेसरीज बनवताना सुरुवातीला नेमकी गरज काय, हे पाहिले जाते. त्यानंतर त्या बॉडी पार्टच्या डिझाईन वर विचार केला जातो. डिझाईन करताना तो पार्ट बाईकच्या बाहेर जाता कामा नये, तो बाईकला सुट झाला पाहिजे, याची काळजी घेतली जाते. त्यानंतर बाईकवरच त्या बॉडी पार्टसाठी मोजमाप करुन डिझाईन बनवली जाते. 3D प्रिंटर मशीनने तो पार्ट बनवला जातो. तयार पार्ट पुन्हा बाईकला बसवून टेस्टिंग केले जाते. त्यानंतर लेजर कटिंगमध्ये सेम पार्ट मेटलचा बनवला जातो, असेही आल्हादने सांगितले.
advertisement
एखादी बाईक पूर्ण कस्टमाईज करायची असेल तर साधारण 5 हजारांपासून ते 15 हजारांपर्यंत खर्च केला जातो. जर तयार असलेल्या ॲसेसरिज पैकी काही हवे असेल तर, 200 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत खर्च येतो. तर काही पार्ट 4500 रुपयांपर्यंत देखील आल्हादच्या स्टुडिओमध्ये आहेत. दरम्यान, हा असा डिझाईन आणि मॉडीफिकेशन स्टुडीओ कोल्हापुरात इतरत्र नसल्याचे देखील आल्हादने स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
ॲडव्हेंचर बाईकसाठी आता बाहेर जायची गरज नाही, कोल्हापुरात मिळतेय ही सुविधा, तरुणाने बनवला भन्नाट STUDIO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement