पवन गव्हाळे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी त्याने घरात कुणीच नसताना रक्तदाब नियंत्रित करण्याच्या 200 गोळ्या खाल्ल्या. यानंतर त्याची प्रकृती बिघडली. ज्यावेळी त्याचे कुटुंबीय पुन्हा घरी आले, तेव्हा तरुणाची परिस्थिती पाहून त्यांच्या पायाखालची जमीन हादरली.
घरच्यांनी त्याला तातडीनं नांदुरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान पवनने अखेचा श्वास घेतला. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पवनने इतकं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. शिवाय घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली? याचं गूढ निर्माण झालं आहे. आत्महत्येच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.
advertisement
