ही घटना गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात घडली आहे. २९ वर्षीय आरोपीनं त्याच्याच बहिणीला चाकूचा धाक दाखवून ब्लॅकमेलिंग आणि बलात्कार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मागील दीड महिन्यांच्या कालावधीत दोनदा बहिणीवर बलात्कार केला. दुसऱ्या घटनेनंतर, पीडितेने लैंगिक हिंसाचाराबाबतच्या १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला. बुधवारी, तिला तलाजा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. जिथे तिने तिच्या भावाविरुद्ध एफआयआर दाखल केला.
advertisement
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २२ वर्षीय महिलेचे गेल्या तीन वर्षांपासून गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते, जो तिच्या भावाला ओळखत होता. जेव्हा आरोपी भावाला बहिणीच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली, तेव्हा त्याने स्वत:च्या बहिणीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. १३ जुलै आणि २२ ऑगस्ट रोजी पीडिता घरी एकटी असताना, आरोपीने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच आरोपीनं बहिणीला सिगरेटचे चटके दिल्याची देखील माहिती समोर आली आहे. आरोपीनं दुसऱ्या बहिणीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्यानंतर पीडितेनं १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला आणि पोलिसांना ही बाब कळवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही अविवाहित असून ती तिच्या आईवडिलांसह, तिचा भाऊ, वहिनी आणि त्यांच्या मुलासह राहत होती. आरोपी कार चालक म्हणून काम करत होता. आरोपीनं जेव्हा पहिल्यांदा पीडितेवर अत्याचार केला. तेव्हा त्याची पत्नी माहेरी गेली होती. दुसऱ्या वेळी आरोपीची पत्नी कामानिमित्त घराबाहेर होती. या दोन्ही वेळी बहिणीला घरी एकटं पाहून आरोपीनं अत्याचार केला.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पीडितेला धमकावण्यासाठी वापरलेला चाकू आणि गुन्ह्यादरम्यान त्याने घातलेले कपडे जप्त करण्यात आले आहेत. आरोपी आणि पीडित दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत. भारतीय न्याय संहिताच्या कलम 64(2)(F)(M) आणि 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.