TRENDING:

भरधाव वेगाने कार आली, धडक दिली अन् 15Km फरपटत नेलं; मुलाच्या डोळ्यांसमोर 70 वर्षांच्या आजींचा भयानक मृत्यू!

Last Updated:

नातवाच्या लग्नाच्या तयारीसाठी लेकीकडे निघालेल्या 70 वर्षांच्या आजीला एका भारधाव कारने धडक दिली. मुलाच्या डोळ्यांसमोर आई कारच्या...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळकोट (लातूर) : नातवाच्या लग्नाच्या तयारीसाठी लेकीकडे निघालेल्या 70 वर्षांच्या आजीला एका भारधाव कारने धडक दिली. मुलाच्या डोळ्यांसमोर आई कारच्या मागे फरपटू लागली. तब्बल 15 किलोमीटर कारचालकाने आजींना फरपटत नेलं. रात्रभर शोध घेतल्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी आजींचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर पडलेला सापडला, ही धक्कादायक घटना जळकोट तालुक्यात घडली.
hit and run case
hit and run case
advertisement

...अशी घडली भयंकर घटना

सविस्तर माहिती अशी की, चिमणाबाई विठ्ठलराव बाचीफळे (वय-70, रा. घाटबरोळ, ता. हुमनाबाद, जि. बिदर) असे या वयस्क महिलेचे नाव आहे. 11 दिवसांवर नातू विशालचे लग्न आले होते. लग्नकार्यात मदत करण्यासाठी त्या लेकीकडे बाचीफळे कुटुंब नांदेडकडे निघलं होतं. दिग्रस दरम्यान आजींना प्रवासामुळे मळमळू लागले. त्या उलटी करण्यासाठी कारमधून उतरल्या. आई गाडीतून उतरली म्हणून मुलगाही गाडीतूून बाहेर आला.

advertisement

इतक्यात नांदेडवरून भरधाव वेगाने इंडिया कार आली आणि त्या कारचालकाने आजींना जोरदार धडक दिली. तो न थांबता निघून गेला. आजी दिसेनाशा झाल्या. मुलाने कारचा नंबर (एमएच 03 एझेड 8671) घेतला आणि त्याचा पाठलाग सुरू केला. आजींचं शरीर त्या कारचालकाने फरपटत नेला. दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या मदतीने त्यांनी पाटोदा (खु) येथे आजींचा मृतहेद वाईट अवस्थेत आढळून आला.

advertisement

मुलाच्या डोळ्यांसमोर आई केली फरपटत

मुलाने सांगितले की, "आई उलटी करण्यासाठी गाडी उतरली, त्यामुळे मीही तिच्यासोबत उतरलो. तेवढ्यात भरधाव वेगाने एक कार आली आणि आईला जोरदार धडक दिला. तो कारचालक न थांबता निघून गेला. आईकडे पाहिले तर आई जागेवर नव्हती. मी कारचा नंबर घेतला आणि त्याचा पाठलाग सुरू केला. वाटेत आईची साडी दिसली, थोडे पुढे गेल्यानंतर आईच्या गळ्यातील पोत दिसला. काही अंतरावर रक्त आणि आतडी दिसली. आम्ही कंधारकडे जाऊन पोलिसांनी माहिती दिली. पहाटे पोलिसांनी शोध सुरू केला, तेव्हा पाटोदा (खु) येथे आईचे मृत शरीर दिसले."

advertisement

हे ही वाचा : 'दादा तो मला त्रास देतोय...', बहिणीने वाढदिवसाला केक कापला, त्याच चाकूने भर रस्त्यात भोसकलं!

हे ही वाचा : Hingoli Crime : आधी प्रियकरासोबत मिळून नवऱ्याचा गेम केला, मग पोलिसांवर बनाव, अवघ्या 4 तासात बायको प्रियकराचं बिंग फुटलं

मराठी बातम्या/क्राइम/
भरधाव वेगाने कार आली, धडक दिली अन् 15Km फरपटत नेलं; मुलाच्या डोळ्यांसमोर 70 वर्षांच्या आजींचा भयानक मृत्यू!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल