advertisement

'दादा तो मला त्रास देतोय...', बहिणीने वाढदिवसाला केक कापला, त्याच चाकूने भर रस्त्यात भोसकलं!

Last Updated:

बहिणीने वाढदिवसाला ज्या चाकूने केक कापला, त्याच चाकूने तिला त्रास देणाऱ्याची भावाने हत्या केली आहे.

'दादा तो मला त्रास देतोय...', बहिणीने वाढदिवसाला केक कापला, त्याच चाकूने भर रस्त्यात भोसकलं! (Meta AI Image)
'दादा तो मला त्रास देतोय...', बहिणीने वाढदिवसाला केक कापला, त्याच चाकूने भर रस्त्यात भोसकलं! (Meta AI Image)
Crime : बहिणीने वाढदिवसाला ज्या चाकूने केक कापला, त्याच चाकूने तिला त्रास देणाऱ्याची भावाने हत्या केली आहे. 22 वर्षांच्या अभिषेक टिंगा याने आपल्या बहिणीसमोर आक्षेपार्ह हावभाव करणाऱ्या व्यक्तीच्या हत्येची योजना आखली.
अनिल हा अभिषेकच्या बहिणीला वारंवार त्रास देत होता, तसंच तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होता. यानंतर बहिणीने होत असलेल्या या छळाची भाऊ अभिषेककडे तक्रार केली. यातून संतापलेल्या अभिषेकने अनिलला मारण्याची योजना आखली आणि 5 चाकू ऑनलाईन पद्धतीने मागवले. याचसोबत अभिषेकने अनिलच्या हालचालींवरही लक्ष ठेवायला सुरूवात केली.
शुक्रवारी अनिल दारू पित असताना अभिषेकने चाकूने भोसकून त्याची हत्या केली. अभिषेकने अनिलची हत्या करण्यासाठी जो चाकू वापरला, तोच चाकू बहिणीच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी वापरण्यात आला होता. मध्य प्रदेशच्या गुनामध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.
advertisement
दुसरीकडे दिल्लीतून समोर आलेल्या आणखी एका धक्कादायक घटनेत, बवाना परिसरात दोन गटांमधील वादात एका 29 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली, तर दोघे जण जखमी झाले. गस्त घालत असताना, एका पथकाला हल्ल्याची माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी पोहोचले जिथे तीन जणांवर चाकूने वार केल्याचे आढळून आले', असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
advertisement
तिघांनाही महर्षी वाल्मिकी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यापैकी एक नियाज याला मृत घोषित करण्यात आले. इतर दोघे, तोसिन (20) आणि निहाल (34) यांना उपचारासाठी लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात पाठवण्यात आले. चाकू हल्ल्याच्या याप्रकरणात नरेला औद्योगिक क्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'दादा तो मला त्रास देतोय...', बहिणीने वाढदिवसाला केक कापला, त्याच चाकूने भर रस्त्यात भोसकलं!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement