TRENDING:

25 लाखांवर हात मारला, स्वत:वर चाकुने केले वार, लुटीचा प्रकार फसला अन् बँकेचा अधिकारीच अडकला

Last Updated:

Crime in Dharashiv: बँकेच्या शाखाधिकार्‍याने २५ लाख रुपये लुटल्याचा बनाव रचत स्वतःवर वार केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव : लोकमंगल को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखाधिकार्‍याने २५ लाख रुपये लुटल्याचा बनाव रचत स्वतःवर वार केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी डोळ्यात मिरची पूड टाकून २५ लाख रुपये पळवल्याचा बनाव शाखाधिकाऱ्याने रचला होता. मात्र त्याचं बिंग फुटलं आहे. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
News18
News18
advertisement

कैलास घाटे असे आरोपी शाखाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याला ऑनलाईन गेमिंग व्यसन लागलं होतं. तसेच त्याच्यावर काही खासगी कर्ज देखील होतं. याच कारणातून त्याने ज्या बँकेत काम करतो, त्याच बँकेला लुटण्याचा प्लॅन आखला. त्याने बँकेची रक्कम स्वत:कडे ठेवून लुटीचा बनाव रचला. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी त्याचं बिंग फोडलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी आपल्यावर हल्ला केला आणि बनाव खरा वाटावा, यासाठी आरोपीनं स्वतःच्या अंगावर शस्त्राने वार करून घेतले.

advertisement

नेमकं प्रकरण काय?

नळदुर्ग येथील लोकमंगल को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा शाखाधिकारी कैलास घाटे याने ३० जून रोजी पोलिसांना माहिती दिली की, तो २५ लाख रुपयांची रोकड सोलापूर येथील मुख्य कार्यालयात जमा करण्यासाठी दुचाकीवरून जात होता. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर चापला तांड्याजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याला ओव्हरटेक करून डोळ्यात मिरची पूड फेकली. डोळ्यात मिरची गेल्याने घाटेने दुचाकी थांबवली असता, चोरट्यांनी पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. घाटेने प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्याच्या छाती, पाठ आणि उजव्या खांद्यावर वार करून २५ लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन पलायन केलं, असा बनाव आरोपीनं रचला.

advertisement

या घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसाच्या स्थानिक गुन्हे शाखेने काही तासातच हा तपास सुरू केला. या तपासात हा शाखाधिकारीच मास्टरमाइंड असल्याचं समजलं. पोलिसांनी शाखाधिकार्‍याने लपवलेली रक्कम जप्त केली असून त्याला अटक देखील केली आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
25 लाखांवर हात मारला, स्वत:वर चाकुने केले वार, लुटीचा प्रकार फसला अन् बँकेचा अधिकारीच अडकला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल