TRENDING:

बीड हादरलं! आईचा छळ पाहिला अन् 19 वर्षाच्या तरुणाचं डोकं फिरलं, मध्यरात्रीच बापाला...

Last Updated:

Beed News: घटनास्थळी जवळपास 20 झोपड्या असतानाही रात्रीच्या शांततेत घडलेली ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: घरगुती वाद आणि आईचा सातत्याने होणारा छळ याला वैतागलेल्या 19 वर्षीय मुलाने स्वतःच्या वडिलांच्या डोक्यात दगड घातला. कडा (ता. आष्टी) येथे सोमवारी पहाटे ही धक्कादायक घटना उघडकीस आली. अनिल मुळे (वय 50) असे मृताचे नाव असून, या प्रकरणात त्यांचा मुलगा करण मुळे (वय 19) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बीड हादरलं! आईचा छळ पाहिला अन् 19 वर्षाच्या तरुणाचं डोकं फिरलं, मध्यरात्रीच बापाला...
बीड हादरलं! आईचा छळ पाहिला अन् 19 वर्षाच्या तरुणाचं डोकं फिरलं, मध्यरात्रीच बापाला...
advertisement

मुळे कुटुंब मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून, गेल्या काही वर्षांपासून कडा येथील बसस्थानक परिसरात वास्तव्यास होते. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात वडील अनिल यांना दारूचे व्यसन होते. नशेत ते पत्नीवर वारंवार मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्रीही त्यांनी दारूच्या नशेत घरात वाद घातल्याने पत्नी आणि मुलगा वेगळ्या झोपडीत झोपायला गेले होते.

advertisement

लग्नानंतरही दोघांचं सुरू होतं, त्यानं टाळलं, पण ‘ती’ ऐकेना, नेपाळी ‘लव्हस्टोरी’ भयानक शेवट, पुणे हादरलं!

दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास दीर्घकाळ मनात साचलेल्या संतापातून करणने बाहेर झोपलेल्या वडिलांवर मोठा दगड फेकून हल्ला केला. या घटनेत अनिल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे पत्नी उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला.

advertisement

View More

विशेष म्हणजे, घटनास्थळी जवळपास 20 झोपड्या असतानाही रात्रीच्या शांततेत घडलेली ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. तसेच पंचनामा प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे मृतदेह काही काळ जागीच पडून राहिला होता. या प्रकरणात तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी मुलगा खुलताबाद येथे असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

दरम्यान, दोन महिन्यांत आष्टी तालुक्यातील ही दुसरी खूनाची घटना ठरली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मृताच्या पत्नीने आयुष्यभर सहन केलेल्या अत्याचाराची व्यथा व्यक्त करत आता कुटुंबाच्या भवितव्याची चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
बीड हादरलं! आईचा छळ पाहिला अन् 19 वर्षाच्या तरुणाचं डोकं फिरलं, मध्यरात्रीच बापाला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल