TRENDING:

Beed News: बीड अपहरण प्रकरणात मोठं अपडेट, 24 तासांत तपासाची चक्रे फिरली, 10 जण ताब्यात

Last Updated:

Beed News: बीडमधील नागनाथ नन्नवरे अपहरण प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. 24 तासांत तपासाची चक्रे फिरवत 10 जणांना ताब्यात घेतले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: मराठवाड्यातील बीड जिल्हा वाढत्या गुन्हेगारी कृत्यांमुळे नेहमी चर्चेत आहे. शुक्रवारी शहरातील चऱ्हाटा फाटा परिसरातून सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास 10 ते 12 जणांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत नागनाथ नन्नवरे या व्यक्तीचं अपहरण केलं होतं. यानंतर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील टोकवाडी परिसरात नेऊन डांबुन ठेवलं. पोलिसांनी आज डांबुन ठेवलेल्या ठिकाणी पोहचून 10 आरोपींसह दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed News: बीड अपहरण प्रकरणात मोठं अपडेट, 24 तासांत तपासाची चक्रे फिरली, 10 जण ताब्यात
Beed News: बीड अपहरण प्रकरणात मोठं अपडेट, 24 तासांत तपासाची चक्रे फिरली, 10 जण ताब्यात
advertisement

नेमकं घडलं काय?

बीड शहराजवळील चराटा फाटा परिसरात शुक्रवारी एका तरुणाला 10-15 जणांनी बेदम मारहाण केली. टोळक्यानं रस्त्यात तरुणाला अडवून हॉकी स्टिकने मारहाण केली. त्यानंतर महादेव नन्नवरे याला रस्त्यावर ओढत नेऊन एका जीपमध्ये टाकलं. त्यानंतर त्याचं अपहरण केल्याचा प्रकार घडला. हा सगळा प्रकार तिथे उपस्थिती काही महिलांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. व्हिडीओमध्ये महिला ओरडत आणि रडताना दिसत आहेत.

advertisement

Beed: बीड नव्हे बिहार! तरुणाला अमानुष मारहाण, रस्त्यावर फरफटत नेत जीपमध्ये टाकलं, VIDEO

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात टोकवाडी परिसर येथे नन्नवरे याला डांबून ठेवले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जात 10 आरोपींसह 2 चारचाकी गाड्यात ताब्यात घेतल्या. या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

advertisement

दरम्यान, गेल्या काही काळात बीडमधील गुन्हेगारी सत्र सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी  माजलगाव तालुक्यातील उपसरपंचाला रस्त्यावर अडवून गुंडांनी लोखंडी पाईप, कोयत्या आणि दगडाने अमानुष मारहाण केली होती.

मराठी बातम्या/क्राइम/
Beed News: बीड अपहरण प्रकरणात मोठं अपडेट, 24 तासांत तपासाची चक्रे फिरली, 10 जण ताब्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल