Beed: बीड नव्हे बिहार! तरुणाला अमानुष मारहाण, रस्त्यावर फरफटत नेत जीपमध्ये टाकलं, VIDEO
- Published by:Sachin S
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
शहराजवळील चराटा फाटा या ठिकाणाहून या तरुणाचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. ननवरे नामक युवकाला बेदम मारहाण करताना दहा ते पंधरा तरुण
बीड: बीडमध्ये गुन्हेगारांना कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न कायम उपस्थितीत केला जात आहे. मारामाऱ्या, खून आणि अपहरणाच्या घटना वारंवार घडत आहे. अशातच आणखी एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. टोळक्याने या तरुणाला बेदम मारहाण करत अपहरण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहराजवळील चराटा फाटा या ठिकाणाहून या तरुणाचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. ननवरे नामक युवकाला बेदम मारहाण करताना दहा ते पंधरा तरुण दिसत आहेत. टोळक्यांनी या तरुणाला अडवलं आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण करत आहे. या तरुणाला रस्तावर ओढत घेऊन जात आहे. पुढे जाऊन या तरुणाला एका जीपमध्ये टाकलं आहे.
advertisement
हा सगळा प्रकार तिथेच उपस्थितीत असलेल्या काही महिलांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. व्हिडीओमध्ये या महिला ओरडत आणि रडत आहे. या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अद्याप युवकाचा शोध लागलेला नाही. पोलिसाचे पथक या तरुणाचा शोध घेत आहे.
उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना टोळक्याने अमानुषपणे मारहाण
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी माजलगाव तालुक्यातील उपसरपंचाला रस्त्यावर अडवून गुंडांनी लोखंडी पाईप, कोयत्या आणि दगडाने अमानुषपणे मारहाण केली होती. या घटनेना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बीडच्या माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी गावात ही घटना घडली होती. उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना टोळक्याने अमानुषपणे मारहाण केली होती. लक्ष्मण चव्हाण यांनी ग्रामसभेमध्ये चुकीच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थितीत केला होता. याचा राग धरून गावातील ग्रामसभेत चुकीच्या कामाला विरोध केला म्हणून सरपंच पती आणि चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून चव्हाण यांना मारहाण करण्यात आली होती.
Location :
Bid Rural,Bid,Maharashtra
First Published :
September 13, 2025 12:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: बीड नव्हे बिहार! तरुणाला अमानुष मारहाण, रस्त्यावर फरफटत नेत जीपमध्ये टाकलं, VIDEO