कोडरमा - पाश्चात्य देशांमध्ये लिव्ह इन रिलेशन हे फार कॉमन आहे. मात्र, आता भारतातही याचे प्रमाण दिसून येत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तरुण आणि तरुणी लग्न न करता एकाच घरात पती पत्नीसारखे राहतात. मात्र, या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना अनेकांमध्ये वाद घडून हत्येच्याही घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक धक्कादायक घटना घडली होती.
advertisement
झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या 25 वर्षीय लिव्ह इन पार्टनर तरुणीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तब्बल 40 ते 50 तुकडे करुन ते फकले होते. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पण ही सर्व परिस्थिती पाहता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भारतीय कायद्यात काय तरतूद आहे, हे माहिती असणे फार गरजेचे आहेत.
याबाबत कोडरमा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे संरक्षण परिषदेचे ॲड. अरुण कुमार यांनी महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, जागरूकतेचा अभाव आणि शिक्षणाचा अभाव यामुळे मुली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जातात. भारतीय समाजही हे नाते योग्य मानत नाही. पण कायद्याने सज्ञान मुले आणि मुली परस्पर संमतीने पती-पत्नी म्हणून राहू शकतात. मात्र, सध्या भारतात याबाबत कोणताही कायदा नाही. या कालावधीत दोघांनाही मूल झाल्यास आई आणि वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा समान हक्क असेल.
विवाहित महिला किंवा विवाहित पुरुष दुसऱ्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही. कायद्याने हा गुन्हा आहे. जर पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे झाले असतील आणि दोघांनाही दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे असेल, तर सर्वात आधी त्या पती-पत्नीला कायद्यानुसार घटस्फोट घ्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
असा राज नंदी पाहिला नसेल, किंमत आहे तब्बल 16 लाख रुपये, असं काय आहे यात खास?
पुढे बोलताना ते म्हणाले की, अशी अनेक प्रकरणे न्यायालयात समोर येतात, ज्यामध्ये एखादा तरुण-तरुणी काही काळ परस्पर संमतीने पती-पत्नी म्हणून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात. यानंतर कोणताही वाद निर्माण झाला तर दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करतात. त्यामुळे ही परिस्थिती जर टाळायची असेल तर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जाण्यापूर्वी, दोघेही परस्पर संमतीच्या आधारे कायदेशीर करार (legal agreement) तयार करू शकतात. यामुळे भविष्यात दोघांपैकी कोणीही दुसऱ्याला ओलीस ठेवण्याचा, बळजबरी किंवा इतर कशाचाही वापर करून खोटे आरोप करू शकणार नाही.
तसेच जर अल्पवयीन मुलगा आणि मुलगी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असतील आणि त्यांच्यात शारीरिक संबंध असतील. तर ही परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आल्यास पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.