पण आज तुम्हाला आम्ही अशा एका चोराबद्दल सांगणार आहोत, जो चोर लोकांच्या गॅलरीत शिरुन दोरीवर सुकवलेले कपडे चोरत आहे. आश्चर्य तर पुढे आहे की हा चोर पॅन्ट, शर्ट, टॉवेल, चादर अशा गोष्टी चोरत नाही आहे, तर तो चक्क महिलांचे अंतर्वस्त्र चोरत आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलत, हा चोर दोरीवर सुकत घातलेल्या महिलांच्या पॅन्टी किंवा अंडरवेअर चोरी करतो.
advertisement
आता तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की नेहमी पैसे, दागिने चोरी करणारे चोर ऐकले आहे. पण हा कसला नवीन चोर आहे, जो फक्त अंडरवेअर चोरतो? आणि असं करुन त्याला मिळतं तरी काय?
बेंगळुरूच्या हेब्बगोडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. घरातील गॅलरीत किंवा अंगणात वाळत घातलेले अंतर्वस्त्र अचानक गायब होत होते. सुरुवातीला अनेकांनी याकडे दुर्लक्ष केलं, पण ही घटना वारंवार घडू लागल्याने रहिवाशांनी सीसीटीव्ही (CCTV) तपासले आणि एका विकृत तरुणाचा चेहरा समोर आला.
नेमका काय आहे हा विचित्र प्रकार?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण रात्रीच्या अंधारात अतिशय शिताफीने घरांच्या बाल्कनीमध्ये आणि अंगणात घुसताना दिसला. विशेष म्हणजे, तो घरातील इतर कोणत्याही मौल्यवान वस्तूंना हात लावत नव्हता. त्याचे एकमेव लक्ष असायचे ते म्हणजे वाळत घातलेले महिलांचे अंडरगारमेंट्स. तो हे कपडे चोरून पसार व्हायचा. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आणि 24 तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या.
आरोपी कोण आहे?
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमूल (23 वर्षे) असून तो मूळचा केरळचा रहिवासी आहे. नोकरीनिमित्त तो बेंगळुरूमध्ये राहत होता. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना जे दिसलं ते पाहून पोलीसही चक्रावून गेले. अमूलच्या घरातून महिलांच्या अंतर्वस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसी खाक्या दाखवताच अमूलने आपला गुन्हा मान्य केला. त्याने दिलेली कबुली अतिशय धक्कादायक आहे. त्याने सांगितले की, "मला महिलांचे अंडरगारमेंट्स चोरून ते परिधान करण्याची सवय आहे. असे केल्याने मला एका वेगळ्या प्रकारचे सुख किंवा नशा (Euphoria) मिळते." एवढेच नाही तर, चोरलेले हे कपडे घालून तो स्वतःचे व्हिडिओ देखील बनवत असे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हेब्बगोडी पोलिसांनी या विकृत तरुणावर चोरी (कलम ३०३(२)), विनापरवाना घरात घुसणे (कलम ३२९(४)) आणि महिलांच्या विनयभंगाशी संबंधित (कलम ७९) अशा विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्याने हे व्हिडिओ कुठे कुठे पसरवले आहेत, याचाही शोध घेतला जात आहे.
या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, रात्रीच्या वेळी गॅलरीत कपडे वाळत घालताना किंवा घराबाहेर वावरताना महिलांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
