रोहित सैनी असं खून करणाऱ्या भाजप नेत्याचं नाव आहे. तो राजस्थानमधील अजमेर येथील रहिवासी आहे. तर संजू सैनी असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रोहित सैनीची प्रेयसी रितूला देखील ताब्यात घेतलं आहे. दोघांची कसून चौकशी सुरू आहे.
प्रेयसीसाठी पत्नीची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेता रोहित सैनीने त्याची प्रेयसी रितू सैनीच्या सांगण्यावरून त्याची पत्नी संजूची हत्या केली. सुरुवातीला रोहितने पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला की काही अज्ञात दरोडेखोर घरात घुसले, त्यांनी संजूची हत्या केली आणि मौल्यवान दागिने घेऊन पळून गेले, परंतु पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. तेव्हा रोहितचे जबाब वारंवार बदलू लागले. या विरोधाभासानंतर पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला.
advertisement
हत्येला दरोड्याचं स्वरूप देण्याचा प्रयत्न
अतिरिक्त एसपी ग्रामीण दीपक कुमार म्हणाले की, आरोपीची काटेकोरपणे चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. रोहितने सांगितले की त्याचे त्याची प्रेयसी रितूशी दीर्घकाळचे संबंध होते आणि पत्नी संजू त्यांच्या नात्यात सर्वात मोठा अडथळा होती. रितूनेच त्याच्यावर संजूपासून सुटका करण्यासाठी दबाव आणला आणि या दबावाखाली रोहितने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली.
खून केल्यानंतर, रोहितने संपूर्ण घटना दरोड्यातून घडली असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल. परंतु पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेमुळे आणि जलद तपासामुळे त्याचा कट उघडकीस आला. या प्रकरणात मुख्य आरोपी रोहित सैनीला पोलिसांनी आधीच अटक केली होती. आता तपासात त्याची प्रेयसी रितूचा सहभाग समोर आल्याने पोलिसांनी तिलाही अटक केली आहे. पोलीस आता दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत आणि या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.