प्रकरण हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी सांगितलं की, तिगडाणा गावातील तरुणाचे त्याच्याच वहिनीसोबत अवैध संबंध होते. दोघांचे 4 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेच्या नवऱ्याला याची अजिबात कल्पनाही नव्हती. दरम्यान, महिलेचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबतही अवैध संबंध होते. हा प्रकार दीर दीपकला कळताच तो संतापला.
Crime News: आईने हात पकडले, भावाने पाय पकडले अन् बापाने दाबला तरुणीचा गळा; धक्कादायक कारण समोर
advertisement
दिपकला आपल्या वहिनीसोबत लग्न करायचं होतं आणि तिला बायको बनवायचं होतं. तो याबद्दल तिच्यासोबत बोलणार होता. मात्र त्याआधीच त्याला आपल्या वहिनीचे आणखी एका व्यक्तीसोबत संबंध असल्याचं समजलं. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती. दिपकने वहिनीला असं न करण्याचा सल्लाही दिला, मात्र तिने ऐकलं नाही. या वादातूनच महिलेची हत्या झाली. याप्रकरणी महिलेच्या पतीने चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना भिवानीचे एसपी वरुण सिंगला यांनी सांगितलं की, मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर तिगराणा येथील रहिवासी दीपक उर्फ छोटू याला अटक करण्यात आली आहे. त्याने सांगितलं की, त्याचे त्याच्या वहिनीसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आपल्या वहिनीचं दुसऱ्यावर प्रेम आहे, असं वाटल्याने त्यांच्यात भांडण झालं आणि या भांडणातूनच त्याने वहिनीचा गळा चिरून खून केला.
