TRENDING:

वाढदिवसाला केक उशिराने आणला, नवरा संतापला आणि बायको आणि लेकरावरच केले चाकूने वार!

Last Updated:

वाढदिवसाचा केक घरी उशिरा आणला म्हणून रंजनाचा नवरा राजेंद्र हा खूप चिडला होता. घरी येताच त्यानं रंजनाशी वाद घालण्यास सुरुवात केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: वाढदिवसाला केक उशिरा आणला म्हणून एका इसमानं रागानं आपली पत्नी आणि मुलावर थेट चाकूनं वार केले. मुंबईत साकीनाका इथं ही घटना घडली आहे.
 (प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

राजेंद्र शिंदे (वय ४५) असं पत्नी आणि मुलावर वार करणाऱ्या इसमाचं नाव आहे. मुंबईत साकीनाका इथं ही घटना घडली आहे. शनिवारी (1 जून) राजेंद्र याचा वाढदिवस होता. त्याची पत्नी रंजना घरोघरी मदतनीस म्हणून घरकाम करते. तिला कामाच्या ठिकाणी उशिर झाला. त्यामुळं ती वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वाबारा वाजता पतीच्या वाढदिवसाचा केक घेऊन घरी आली.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढदिवसाचा केक घरी उशिरा आणला म्हणून रंजनाचा नवरा राजेंद्र हा खूप चिडला होता. घरी येताच त्यानं रंजनाशी वाद घालण्यास सुरुवात केली. तिला शिवीगाळ केली. घरात हे सगळं सुरू असताना जेव्हा रंजना आणि राजेंद्र यांच्या मुलानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजेंद्रला आणखी राग आला.

रागाच्या भरात राजेंद्रचा स्वतःवरचा ताबा सुटला. तो थेट स्वयंपाकघरात गेला आणि त्यानं चाकू आणला. रागारागात त्यानं आपल्या लेकराच्या फासळ्यांखाली आणि छातीवरही चाकूनं सपासप वार केले. हे सगळं घडत असताना रंजना आरडाओरडा करत होती, नवऱ्याला हे सगळं करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होती; पण त्यानं जराही दया दाखवली नाही. ती नवऱ्याला थांबवून मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करायला धावली तेव्हा त्यानं तिच्या मनगटावरही चाकूने वार केला.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात रंजना आणि तिचा मुलगा दोघंही जखमी झाले होते. दोघांचे कपडे रक्ताने माखले होते. घरातला हा सगळा आरडाओरडा ऐकून आजूबाजूची माणसं आली आणि त्यांनी दोघांना दवाखान्यात दाखल केलं. हीच संधी साधून राजेंद्र तिथून पसार झाला. रंजनावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आलं. मात्र तिच्या मुलावर घाटकोपर इथल्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

साकीनाका पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल (कलम 307) राजेंद्र शिंदे याच्या विरोधात रंजनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर तो फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. लवकरच तो पोलिसांच्या तावडीत सापडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
वाढदिवसाला केक उशिराने आणला, नवरा संतापला आणि बायको आणि लेकरावरच केले चाकूने वार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल