बुलढाण्याच्या मातोळा तालुक्यातील दाभाडी गावात ही घटना घडली आहे. दाभाडी गावातील पशूवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांनी बायकोची हत्येसाठी फुलप्रुफ प्लानिंग केली होती. विशेष म्हणजे हे प्रकरण दडपण्यासाठी त्यांनी दरोड्याचा बनाव रचला होता.
त्याचं झालं असं की डॉ. गजानन टेकाळे यांचं त्यांच्याच मेहुणीसोबत प्रेमसंबंध होते. या गोष्टीची कल्पना टेकाळे यांच्या बायकोला अजिबात नव्हती. पण मेहुणी भाऊजींच्या या प्रेमसंबंधात बायको अडसर ठरत होती. त्यामुळे मेहुणीने माझ्या सख्या बहिलीला संपवून माझ्याशी लग्न कर अशी अट घातली होती. त्यामुळे मेहुणीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या टेकाळे यांनी बायकोत्या हत्येचा कट रचला होता.
advertisement
त्यानुसार 18 जानेवारीच्या रात्री डॉ. टेकाळे यांनी बायको माधुरी टेकाळे यांच्या एसिडीटीच्या चुर्णामध्ये झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली.त्यानंतर माधुरी यांना पटकन झोप आली. माधुरी गाढ झोपेत गेल्यानंतर टेकाळे यांनी त्यांच्या तोंड उशीने दाबून त्याचा जीव घेतता. त्यानंतर कपाटातलं सामान अस्ताव्यस्त करून जमिनीवर पाडलं जेणेकरून ही घटना दरोडा वाटेल. त्यानंतर टेकाळे यांनी झोपेच्या काही गोळ्या खाऊन बेशुद्धाअवस्थेत असल्याचा देखावा केला. सकाळी 19 जानेवारीला ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरोड्याचा तपास सूरू केला होता.
'त्या' फोटोने हत्येचा उलगडा
तपासादरम्यान पोलिसांना घरात घुसखोरी केल्याचा कोणता पुरावा मिळाला. ना घरात कोणत्याही अज्ञात व्यक्तीचे ठसे किंवा श्वानपथकाच्या हाती देखील काहीच लागले नाही. त्यामुळे पोलिसांसमोर घटनेचा उलगडा करण्याचे मोठं आव्हान होतं. या दरम्यान पोलिसांनी गजानन टेकाळे यांच्या फोनंमध्ये त्यांचा एका तरूणीसोबतचा फोटो दिसून आला. हा फोटो त्यांच्या मेहुणीचा होता. टेकाळे यांचे मेहुणीसोबत गेल्या 10 वर्षापासून प्रेमसंबंध सुरु होते. या संबंधातूनच मेहुणीने टेकाळे यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकला होता. त्यामुळेच त्यांनी बायकोची हत्या केली.
सख्या बहिलीला संपवून माझ्याशी लग्न कर यासाठी डॉक्टरला त्यांची मेहुणी त्रास देत होती, त्यामुळंचे बायकोची हत्या केल्याचे गजानन काळे याने पोलिसांसमोर कबुल केले. या घटनेमुळे डॉक्टरच दरोड्याच बिंग फुटलं. आता पोलिसांनी डॉक्टरच्या मेहुणीलाही अटक केली आहे. या घटनेने बुलढाणा हादरलं आहे.
