ही घटना देऊळगाव राजा – सिंदखेड राजा मार्गावरील आर. जे. इंटरनॅशनल स्कूलजवळील वनविभागाच्या जागेत घडली. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हत्या की अपघात?
प्राथमिक तपासात म्हस्के यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह स्वतःच्या गाडीतच आढळल्याने, ही आत्महत्या नसून हत्या असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला असून, हा घातपात होता का, याचा शोध घेतला जात आहे. मृत्यूमागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.