पुतण्याला वाचवण्यासाठी काकाने घेतली उडी...
मिळालेल्या माहितीनुसार गोरख देवसिंग देवरे (वय-50) आणि पुतण्या नीलेख राजेंद्र देवरे (वय-23. रा. अस्ताने) अशी मृतांची नावे आहेत. नीलेश हा शेतातील विहिरीजवळ मोबाईवर पीक-पाण्याचे सर्वेक्षण करीत उभा होता. जवळच चारा चरत असलेला बैल अचानक नीलेशच्या दिशेने धावत आला.
दोघांचाही दुर्दैवी अंत
बैलाने नीलेशला जोराची धडक दिली. त्यात त्याचा तोल गेली आणि तो विहिरीत पडला. ही घटना पाहताच नीलेशचे काका गोरख विहिरीच्या दिशेने धावले आणि पुण्याला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. पण विहिरीत पाणी जास्त असल्यामुळे काकाचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि दुर्दैवाने काका-पुतण्या विहिरीत बुडून मृत्यूमुखी पडले.
advertisement
हे ही वाचा : Thane News: धक्कादायक! पोटच्या मुलीने वडिलांना सोडलं बेवारस, अर्धनग्न अवस्थेत काढले पाच दिवस
हे ही वाचा : नाशिक हादरलं! के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजबाहेर मोठी दुर्घटना, पोरासमोर बापानं सोडला जीव!