Thane News: धक्कादायक! पोटच्या मुलीने वडिलांना सोडलं बेवारस, अर्धनग्न अवस्थेत काढले पाच दिवस
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Thane News: सूर्यप्रकाश यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य नाही, त्यामुळे ते त्यांच्या मुलीकडे मनमाड येथे राहत होते.
ठाणे: आई-वडील आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. मुलांसाठी काबाड कष्ट करतात. मुलांनी आपल्या वृद्धापकाळात आपला आधार व्हावं, अशी माफक इच्छा आई-वडिलांची असते. मात्र, काही मुलं दगडाच्या काळजाची असतात. आई-वडील वृद्ध झाल्यानंतर ते त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. ठाणे रेल्वे स्टेशनवर अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मनमाड येथे राहणाऱ्या मुलीने वृद्ध वडिलांना ठाणे रेल्वे स्टेशनवर सोडून दिलं आहे.
या घटनेबद्दल सर्वत्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत ही वृद्ध व्यक्ती पाच दिवस रेल्वेस्टेशनजवळील एसटी आगारात होती. एका नागरिकाने त्यांना विठ्ठल सायन्ना जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आणून सोडलं. तिथेही त्यांना उपचाराविना उघड्यावर राहावं लागलं. सुरक्षा रक्षकाने त्यांची विचारपूस केली असता, पाच दिवसांपूर्वी आपल्या मुलीने याठिकाणी आणून सोडल्याचं सांगितलं.
advertisement
रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने पुकार सेवा प्रतिष्ठान नावाच्या संस्थेला याबाबत माहिती दिली. त्यानंतर संस्थेने रुग्णालयात येऊन या वृद्ध व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू करण्यात आले आहेत. या व्यक्तींच नाव सूर्यप्रकाश घायवळ असून ते 75 वर्षांचे आहेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर गावात राहणाऱ्या सूर्यप्रकाश यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य नाही. त्यामुळे ते त्यांच्या मुलीकडे मनमाड येथे राहत होते. आता मुलीनेही त्यांना ठाणे स्टेशन येथे आणून दिलं.
advertisement
गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अनेक मुलं आपल्या वृद्ध व आजारी आईवडिलांचा सांभाळ करण्यास नकार देत आहेत. काहीजण त्यांना वृद्धाश्रमात सोडण्याचं सौजन्य तरी दाखवतात. काही मुलं तर तेही कष्ट घेत नाहीत आणि पालकांना रस्त्याच्या कडेला सोडून देतात.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 29, 2025 10:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane News: धक्कादायक! पोटच्या मुलीने वडिलांना सोडलं बेवारस, अर्धनग्न अवस्थेत काढले पाच दिवस