नाशिक हादरलं! के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजबाहेर मोठी दुर्घटना, पोरासमोर बापानं सोडला जीव!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Nashik Accident : के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी ही बस सिडकोतून अंबड पोलिस ठाण्याकडे जात होती. त्याचवेळी मोठी दुर्घटना घडली.
Nashik Crime News : सिडको परिसरातील राजे संभाजी स्टेडियमजवळ एका खासगी शैक्षणिक संस्थेच्या बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील 75 वर्षीय सुरेश अनपट यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा ॲड. उमेश अनपट गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी बसचालक दिलीप गंगाधर गांगुर्डे याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.
बसचा ब्रेक अचानक फेल
ही घटना काल दुपारी 4 वाजेदरम्यान घडली. के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी ही बस सिडकोतून अंबड पोलिस ठाण्याकडे जात होती. त्याचवेळी सुरेश आणि उमेश अनपट हे वडील-मुलगा दुचाकीवरून याच मार्गाने जात होते. संभाजी स्टेडियमजवळ त्यांच्यापुढील एका टेम्पोने वेग कमी केला. त्यामुळे त्यांनीही आपल्या दुचाकीचा वेग कमी केला. मात्र, मागून येणाऱ्या बसचा ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
advertisement
सुरेश अनपट यांचा जागीच मृत्यू
या धडकेमुळे दुचाकी टेम्पोवर आदळली आणि या अपघातात सुरेश अनपट यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा उमेश अनपट गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. सध्या जखमी उमेश अनपट यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
August 29, 2025 9:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिक हादरलं! के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजबाहेर मोठी दुर्घटना, पोरासमोर बापानं सोडला जीव!


