TRENDING:

'माझा टक्कल करतील'; पोलिसांना गुंगारा देत नेपाळपर्यंत पोहोचला, आता अटक होताच ड्रग्ज माफियाला वेगळीच चिंता

Last Updated:

Chhatrapati Sambhajiangar: ‎तपासादरम्यान अशपाकला शहरातील काही राजकीय कार्यकर्त्यांचे गुप्त पाठबळ असल्याचे समोर आले आहे. तो फरार असतानाही काही जण त्याच्या संपर्कात होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : शहरातील गाजलेल्या ड्रग्ज सिंडिकेटप्रकरणी मोठी कारवाई करत गुन्हे शाखेने मुख्य सूत्रधार अशपाक पटेल याला अखेर अटक केली आहे. तब्बल 26 दिवस पोलिसांना गुंगारा देत तो फरार होता. राजकीय पाठबळाच्या जोरावर आणि पोलिस-न्यायालयीन प्रक्रिया ‘मॅनेज’ करता येईल, अशा अविर्भावात वावरणाऱ्या अशपाकचे मनसुबे अखेर उधळले गेले.
‎26 दिवसांनंतर ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड अशपाक जेरबंद; राजकीय कनेक्शनची चौकशी स
‎26 दिवसांनंतर ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड अशपाक जेरबंद; राजकीय कनेक्शनची चौकशी स
advertisement

‎नेपाळ व उत्तर प्रदेश सीमेवर सतत ठिकाणे बदलत पोलिसांना हुलकावणी देणारा अशपाक हा नाशिकमध्ये लपल्याची गोपनीय माहिती पोलिस आयुक्तांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम, दादासाहेब झारगड यांच्या पथकाने तातडीने नाशिक गाठले. वडाळा नाका परिसरातील हॉटेल सॅफरॉन येथे बुधवारी (18 फेब्रुवारी) पहाटे छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान नाशिक गुन्हे शाखेचे पथक आणि क्यूआरटीचा सशस्त्र ताफा सोबत होता.

advertisement

संशयास्पद हालचाल; पोलिसांनी अडवलं, रिक्षात भयंकर दिसलं, तरुणीसोबत.., सावत्र आई-बाप ताब्यात

‎अशपाक हा कुख्यात असल्याने पोलिसांवर हल्ला होण्याची शक्यता गृहीत धरून पूर्ण तयारीत ही मोहीम राबवण्यात आली. अटकेवेळी त्याने विरोध केल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत शेख अशपाक शेख इसाक ऊर्फ अशपाक पटेल (32, रा. रवींद्रनगर, शहाबाजार) याच्यासह पठाण दाऊद मुनव्वर खान (28, रा. बायजीपुरा) आणि सरफराज मिर्झा हाफिज बेग (27, रा. शहाबाजार) यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

advertisement

View More

‎तपासादरम्यान अशपाकला शहरातील काही राजकीय कार्यकर्त्यांचे गुप्त पाठबळ असल्याचे समोर आले आहे. तो फरार असतानाही काही जण त्याच्या संपर्कात होते. इतकेच नव्हे तर पोलिसांच्या हालचालींची माहिती त्याला दिली जात असल्याची बाबही तपासात उघड झाली आहे. आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित राजकीय व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

अशपाकची गुन्हेगारी प्रवृत्ती आक्रमक व दहशत निर्माण करणारी असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. इतरांना त्रास देण्यातून समाधान मानणारा त्याचा स्वभाव असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या भागात तो कायदा हातात असल्यासारखा वावरत असे. मात्र गुन्हे शाखेने आक्रमक भूमिका घेताच त्याचा हा ‘सब मॅनेज कर लूंगा’चा आत्मविश्वास कोलमडला.

advertisement

‎गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याचा आवेश पूर्णपणे उतरलेला दिसला. इतर गुन्हेगारांप्रमाणे आपलीही भररस्त्यात धिंड काढली जाईल, अशी भीती त्याला वाटत असल्याचे समजते. पोलिस टक्कल करतील, अशी भीती त्याने न्यायालयासमोर व्यक्त केल्याची माहिती आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय भाजीपाला- फळे खरेदी करताय? खरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

या कारवाईनंतर ड्रग्ज साखळीतील इतर दुवे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
'माझा टक्कल करतील'; पोलिसांना गुंगारा देत नेपाळपर्यंत पोहोचला, आता अटक होताच ड्रग्ज माफियाला वेगळीच चिंता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल