TRENDING:

नवरा-बायकोचं भांडण, पोटच्या मुलाला गाडीतून बाहेर फेकलं; संतापजनक VIDEO VIRAL

Last Updated:

पालकांनी भांडणाच्या रागात आपल्या मुलाचीही पर्वा केली नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 17 डिसेंबर :  अनेकदा पती-पत्नीच्या भांडणाचा परिणाम त्यांच्या मुलांवर होताना दिसतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नवरा-बायकोमध्ये गाडीतच भांडण झालं. पण त्या रागात त्यांनी आपल्या मुलाचीही पर्वा केली नाही. चिमुकल्या मुलाला त्यांनी गाडीतून बाहेर रस्त्यावर फेकलं.
फोटो - सोशल मीडिया व्हायरल फोटो
फोटो - सोशल मीडिया व्हायरल फोटो
advertisement

या व्हिडिओमध्ये एक जोडपं रस्त्याच्या मधोमध भांडताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या दाम्पत्याने लहान मुलाला रस्त्यावर एकटं सोडलं. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही राग येईल.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अचानक कारमधून उतरताना दिसत आहे. यानंतर तो मागील गेट उघडतो आणि पत्नीचा हात धरून तिला बाहेर काढतो. तो पत्नीला इतका जोरात ओढतो की ती मुलासह रस्त्यावर पडली. नवरा-बायकोचा वाद इतका वाढतो की रस्त्यावर रडताना मुलही दिसत नाही. यावेळी जवळचे लोकही हस्तक्षेप करायला येत नाहीत. प्रत्येकजण दूरवर उभा आहे आणि फक्त पाहत आहे.

advertisement

''ती मेट्रोसोबत फरफटत गेली, मी धावत राहिलो पण...'' चिमुकल्याच्या डोळ्यादेखत आईसोबत घडला धक्कादायक प्रकार

दरम्यान, एक व्यक्ती पुढे येऊन रडत असलेल्या मुलाकडे जाते आणि त्या मुलाला उचलून घेते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ चीनमधील असल्याचं बोललं जात आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @NoCapFights नावाच्या युझरने शेअर केला आहे. जे आतापर्यंत सुमारे 40 लाख लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिले, 'काय भांडण आहे.' दुसऱ्या यूझरने लिहिलं, 'हे खूप वाईट पालक आहेत.'

advertisement

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या/क्राइम/
नवरा-बायकोचं भांडण, पोटच्या मुलाला गाडीतून बाहेर फेकलं; संतापजनक VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल