जोरहाट येथील एका 19 वर्षीय तरुणीचे नर्स बनण्याचे स्वप्न होते. त्यामुळे ती मन लावून अभ्यास करायची. मेहनतीने आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी ती परिश्रम घेत होती. मात्र, त्यातच तिची ओळख राकेश मिली नावाच्या तरुणाशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर तिने आपले काही खासगी फोटोही त्याच्यासोबत शेअर केले. राकेशच्या फोनमध्ये असलेल्या आपल्या या फोटोंबाबत तिला कुठलाही संशय नव्हता. आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करण्यात काही वावगे नाही, असे तिला वाटायचे. मात्र, काही कालावधीनंतर तिच्या आयुष्यात धक्कादायक घटना घडली.
advertisement
काही कालावधीनंतर राकेशची नियत बदलली आणि त्याने याच फोटोंचा वापर करत तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले. जर तिने त्याचे म्हणणे ऐकले नाही तर तो ती फोटो व्हायरल करेन, अशी धमकी तो देऊ लागला. तिला याप्रकाराने मोठा धक्का बसल्याने तिने राकेशपासून थोडे अंतर राखणे पसंत केले. मात्र, त्याने शेवटी तिच्यावर इतका दबाव टाकला की, तिला बळजबरी त्याच्याशी लग्न करावे लागले.
गर्लफ्रेंडसोबतच तिच्या आईसाठीही बॉयफ्रेंडने केलं मोठं कांड, धक्कादायक घटना
आता सर्व ठीक होईल, असे लग्नानंतर पीडितेला वाटले. मात्र, तिच्या आयुष्यातील संकटे आणखी वाढली. राकेशची वागणूक आधीपेक्षा आणखी कठोर झाली. तो तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करू लागला. दिवसेंदिवस तिच्यावर होणारे अत्याचार वाढू लागले. मात्र, तरुणीने सर्व काही सहन केले. मात्र, एकेदिवशी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तिचा मृतदेह हा तिचत्या पतीजवळ बेडवर आढळला. यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला.
यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्या पतीवर हत्येचा आरोप केला. राकेशने तिला बाथरुममध्ये पाण्यात बुडवून तिची हत्या केली आणि मग त्यानंतर तिचा मृतदेह हा बेडवर आणून ठेवला आणि मग दुसऱ्या दिवशी सर्वांसोर तिचा मृत्यू झाल्याचे नाटक केले असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता मृत तरुणीचा पती राकेशला अटक केली आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
