आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला असंख्य प्रश्न उभे राहिले असतील. हा माणूस एका रात्रीत करोडपती झाला, पण हे पैसे कुठून आले? या पैशांचे रहस्य उलगडताच पोलीसही हादरले आणि तब्बल ₹2000 कोटींच्या सायबर ठगीचे (Cyber Fraud) रॅकेट समोर आले.
एका फोन कॉलने उघडले रहस्य: कोण आहे हा 'करोडपती'?
हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला तेव्हा, श्रीगंगानगर पोलिसांनी देशभरातील लोकांना फसवणूक करणाऱ्या एका महाकाय सायबर रॅकेटचा पर्दाफाश केला. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे कृष्ण शर्मा. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर तपास सुरू केला आणि खारडा गावात छापा टाकून कृष्ण शर्माला अटक केली.
advertisement
पोलिसांनी जेव्हा या आरोपीच्या बँक खात्यांची तपासणी सुरू केली, तेव्हा अधिकाऱ्यांना धक्का बसला. कृष्ण शर्माच्या खात्यांमध्ये तब्बल ₹99 कोटी 65 लाख 47 हजार 938 रुपयांची संशयास्पद आर्थिक उलाढाल झाल्याचे आढळून आले. इतकी मोठी रक्कम पाहून पोलीसही चक्रावून गेले आणि ही केवळ एका व्यक्तीच्या खात्यातील उलाढाल आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी अधिक खोलवर तपास सुरू केला.
कृष्ण शर्मा आणि त्याच्या रॅकेटने देशभरातील हजारो लोकांना गंडा घातला होता. तो फक्त फोनवर बोलून लोकांना गंडा घालायचं, तो हे सगळं कसं कसायचा, हे खाली स्टेप बाय स्टेप पाहू
आरोपी व्हॉट्सॲप कॉल्स आणि सोशल मीडिया जाहिरातींचा वापर करून लोकांना खोट्या गुंतवणूक योजना, क्रिप्टो ट्रेडिंग आणि बनावट लकी ड्रॉज द्वारे झटपट पैसे कमवण्याचे आमिष दाखवत होते.
अनेकदा हे आरोपी बँक कर्मचारी, पोलीस किंवा तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे खोटे भासवून लोकांना धमकावत आणि त्यांच्या खात्यांमधून पैसे ट्रान्सफर करवून घेत होते.
या रॅकेटने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगालसह 20 हून अधिक राज्यांमध्ये आपले टार्गेट शोधले होते.
या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलिसांनी "सायबर शील्ड" (Cyber Shield) मोहिमे अंतर्गत तपास तीव्र केला. तपासात 75 हून अधिक बँक खात्यांवर लक्ष ठेवण्यात आले आणि त्यातून ₹51.81 कोटी रुपयांची संशयास्पद आर्थिक उलाढाल उघडकीस आली.
एसपी गौरव यादव यांनी धक्कादायक माहिती दिली की, या फसवणुकीत काही खाजगी बँक कर्मचारी देखील सहभागी होते. त्यांनी योग्य पडताळणी न करताच आरोपींना बनावट खात्यांसाठी ATM आणि पासबुक्स पुरवली होती. ही घटना एका सामान्य व्यक्तीच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा होण्याच्या 'चमत्कारा'मागचे भयानक वास्तव आणि सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान दाखवून देते.
