नवी दिल्लीतील ही घटना आहे. टागोर गार्डनमधील रघुबीर नगरमध्ये राहणारा संजय गुप्ता आणि त्याची पत्नी अनिता गुप्ता या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं होती. मुलगा 17 वर्षांचा होता पण गेल्या वर्षीच टेरेसवरून पडून त्याचा मृत्यू झाला. त्यांची 15 वर्षांची मुलगी रक्षाबंधनला राखी बांधण्यासाठी भाऊ मागू लागली. अखेर या दाम्पत्याने नको तेच पाऊल उचललं.
advertisement
Viral Video - पालक मुलांच्या डोक्यावर फोडत आहेत अंडी; या विचित्र ट्रेंडमागे कारण काय? आहे मोठा धोका
गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास एका अपंग महिलेच्या नवजात बाळाचं अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चट्टा रेल चौकातील फूटपाथवर राहणाऱ्या तक्रारदार दाम्पत्याने असा आरोप केला की, पहाटे 3 वाजता त्यांना जाग आली तेव्हा त्यांना त्यांचं मूल बेपत्ता असल्याचं आढळून आलं आणि त्यांना कोणीतरी त्याचं अपहरण केल्याचा संशय आला.
तपासादरम्यान पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दुचाकीवरून दोघंजण परिसरात फिरताना दिसले. त्यांनी सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि एलएनजेपी हॉस्पिटलपर्यंत त्यांचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी सर्व तपशिलांचं विश्लेषण केलं आणि बाईक संजयच्या नावावर नोंदणीकृत असल्याचं आढळलं.
पोलीस टागोर गार्डनच्या रघुबीर नगरमधील सी-ब्लॉकमध्ये गेले. महिला कर्मचाऱ्यांसह सुमारे 15 सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांनी परिसराला वेढा घातला. तिथं त्यांना आरोपी जोडपं आणि अपहरण झालेलं मूल सापडलं. त्यांनी आपल्या मुलाचा मृत्यू झाला असून मुलीला रक्षाबंधनसाठी भाऊ हवा होता म्हणून त्याचं अपहरण केल्याची कबुली दिली.
पोलिस उपायुक्त (उत्तर) सागर सिंह कलसी यांनी सांगितलं की, चट्टा रेल चौकाजवळ फूटपाथवरील झोपलेल्या नवजात बाळाचं या दाम्पत्याने अपहरण केलं. या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. पेशाने टॅटू आर्टिस्ट असलेल्या संजयचा यापूर्वी तीन गुन्ह्यांमध्ये सहभाग होता.
