Viral Video: 'बाहुबली बाळ'! जन्माला येताच केला असा चमत्कार की सगळेच थक्क, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

Last Updated:

हे बाळ बाहुबलीपेक्षा कमी नाही कारण जन्मताच त्याने असा पराक्रम केला, की नर्सही थक्क झाल्या.

बाहुबली बाळाचा व्हिडिओ
बाहुबली बाळाचा व्हिडिओ
नवी दिल्ली 26 ऑगस्ट : प्रभास आणि राणा दग्गुबती यांचा बाहुबली चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, अविश्वसनीय शक्ती आणि ताकद दाखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची तुलना बाहुबलीशी केली जाते. मोठे आणि शक्तिशाली लोक बाहुबलीसारखे वागले तर काही नवल नाही, पण तुम्ही कधी नवजात मुलाला असं काही करताना पाहिलं आहे का, ज्यानंतर लोक त्याला बाहुबली म्हणू लागले? आता अशाच एका बाळाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात एका बाळाने जन्मानंतर लगेचच खाली असलेला ट्रे आपल्या दोन्ही हातांनी उचलला.
@bhakttrilokika या ट्विटर अकाउंटवर अनेकदा निरनिराळे व्हिडिओ पोस्ट केले जातात. अलीकडेच या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो बाहुबली बाळाचा आहे. होय, हे बाळ बाहुबलीपेक्षा कमी नाही कारण जन्मताच त्याने असा पराक्रम केला, की नर्सही थक्क झाल्या. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे- चांद्रयान चंद्रावर पोहोचताच भारतात जन्माला आलेला “रिअल बाहुबली”.
advertisement
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका नर्सने नवजात बाळाच्या दोन्ही पायांना धरलं आहे. पण यानंतर मुलाने दोन्ही हातांनी खाली असलेला ट्रे पकडला आणि उचलला. हा तोच ट्रे आहे, ज्यात त्याला जन्मानंतर ठेवलं होतं. नवजात बालकांमध्ये जन्माला येताच एखादी गोष्ट घट्ट धरून ठेवण्याची ताकद नसते. मात्र या बाळाने आपल्या कारनाम्याने सर्वांनाच चकित केलं आहे. ज्या नर्सने बाळाला पकडलं आहे ती देखील हे पाहून हैराण झाली.
advertisement
या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने विचारलं, की हा व्हिडिओ खरा आहे का? एकाने म्हटलं की, ज्या डॉक्टरने हे कृत्य केलं आहे, त्याला शोधून अटक करा कारण हे अमानवी आहे. महिलेला तुरुंगात पाठवा, असं एकाने म्हटलं. आणखी एकाने म्हटलं की, बाळासोबत असं काही करणं पूर्णपणे चुकीचं आहे. एकाने विनोद करत म्हटलं, की तो खलीचा नातू असेल! इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.
मराठी बातम्या/Viral/
Viral Video: 'बाहुबली बाळ'! जन्माला येताच केला असा चमत्कार की सगळेच थक्क, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement