मानपाडा पोलिसांनी आरोपी पोपट धाहीजे याचा शोध घेण्यासाठी दोन विशिष्ट पथक तयार केल्याची माहिती मिळत आहे. पती- पत्नीच्या वादामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळचे जालन्याच्या असलेल्या ह्या दाम्पत्यात काल (25 नोव्हेंबर) सकाळी दोघांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून ही हत्या झाली. शेजाऱ्यांनी याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीचा तपास सुरू केला आहे. सोबतच हत्येची सखोल चौकशी करत आहे.
advertisement
दरम्यान, डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहणारे ज्योती धाहीजे आणि पोपट धाहीजे यांच्या वैवाहिक जीवनात गेल्या काही महिन्यांपासून कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होत होते. बुधवारी (26 नोव्हेंबर) त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, पोपट यांनी पत्नी ज्योती हिचा गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर तेथून थेट पळून गेला. या दाम्पत्याला दोन मुलं आणि एक मुलगी अशी 3 आपत्ये आहेत. हत्या केल्यानंतर आरोपी पोपट धाहीजे फरार झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी मानपाडा पोलिसांनी दोन पथके तयार केली असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यामधील धाहिजे कुटुंब रोजगारासाठी डोंबिवलीमध्ये आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते चांगल्या रोजगाराच्या शोधामध्ये होते. आरोपी पोपट धाहीजे हा डोंबिवलीतील एका मोठ्या कन्स्ट्रक्शन साईटवर बिगारी म्हणून काम करत होता. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत ज्योती धाहीजे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवला आहे. पोपटने ज्योतीचा खून का केला याचे कारण पोपटला अटक केल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे पोलीस युद्धपातळीवर आरोपीचा शोध घेत आहेत. त्याला लवकरात लवकर अटक करून कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
