करोडो रुपयाचा मुद्देमाल जप्त
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखा युनिट 4 हैदराबाद नजीकच्या एम डी बनविणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून एम डी ड्रग्जसह , त्यासाठी लागणारे इतर केमिकल व ड्रग बनविण्यासाठी लागणारे साहित्यासह करोडो रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कारखाना मालकास ताब्यात घेण्यात आले आहे . पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून एमडी ड्रग्स पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्यावर कोणी शाखेच्या युनिट 4 ने कामगिरी केली आहे.
advertisement
105 ग्रॅम एम.डी ड्रग्स जप्त
मिरा-भाईंदर शहरात एमडी ड्रग्स विक्री करण्यासाठी आलेल्या महिलेला गुन्हे शाखा -1 च्या पथकाने शुक्रवारी (8 ऑगस्ट) ताब्यात घेतले. या महिलेकडे 105 ग्राम एमडी ड्रग्स आढळून आले आहे. या महिलेविरोधात काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरा-भाईंदर शहरात ड्रग्स विरोधी पोलिसांकडून जोरदार कारवाया सुरू आहेत.
काशीमिरा गुन्हे शाखा-1 पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला काशिमिरा नाका येथे मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स विक्री करण्याकरता येत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सापळा रचून फातिमा मुराद शेख (23) या महिलेला ताब्यात घेतले असता तिच्याकडे 105 ग्राम एमडी ड्रग्स मिळून आले. ज्याची बाजारभावाप्रमाणे एकवीस लाख रुपये किंमत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या महिलेकडे विचारपूस केली असता, दहिसर येथील ड्रग्स माफीया कादर बादशाह याच्याकडून ड्रग्स घेतल्याचे सांगितले.
ड्रग्स माफिया कादर बादशाहला
पोलिसांनी ड्रग्स माफिया कादर बादशाहला देखील ताब्यात घेतले असून ड्रग्सचे मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा तपास केला असता मोठ यश पोलिसांच्या हाती लागल आहे.