तांदळाच्या उकडीसाठी लागणारे साहित्य
एक वाटी तांदळाचे पीठ, तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेले आले, लिंबू, चवीप्रमाणे मीठ, गरम पाणी, गार्निशिंगसाठी बारीक शेव आणि शेंगदाण्याची चटणी एवढेच साहित्य याकरता लागणार आहे.
advertisement
तांदळाची उकड कशी करायची याची कृती
सर्वात पहिले कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचे. तेल गरम झाले नंतर जिरे, मोहरी यांची फोडणी घालायची. त्यामध्ये हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेले आले आणि हिरवी मिरची टाकायची. हे सगळे छान फ्राय झाले की यामध्ये एका वाटीला दोन वाटी गरम पाणी टाकायचे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हळद टाकून द्यायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे. त्यामध्ये तांदळाची पिठी टाकायची. तांदळाची पिठी टाकल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता कामा नये. त्याला पाच मिनिटे शिजू द्यायचे. त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. आपली उकड तयार आहे.
एका सर्व्हिंग प्लेटमध्ये उकड घ्यायची, गार्निशिंगसाठी बारीक शेव टाकायची आणि त्यावरून शेंगदाण्याची चटणी टाकून घ्यायची, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. वरतून लिंबू पिळायचे. अशा पद्धतीने ही उकड बनवून तयार होते. घरी नक्की ट्राय करा.





