रामरतन विनायकराव टिकार असं आत्महत्या करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथील रहिवासी आहे. तो बंगळुरू येथील एका चांगल्या कंपनीत नोकरी करतो. सध्या त्याचं वर्क फ्रॉम होत सुरू होते. त्याला चांगला पगारही होता. मात्र या पगारात तो समाधानी नव्हता. आपल्याला पाहिजे तसे यश प्राप्त झाले नाही, ही खंत त्याच्या मनात होती. यातूनच त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
7 मार्च रोजी संध्याकाळी रामरतन याने आपला चुलत भाऊ सुधीर विश्वासराव टिकार याला मोबाईलवर एक मेसेज पाठवला. ज्यात त्याने आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. शिवाय आत्महत्या का करतोय, याचा खुलासा देखील त्याने त्या मेसेज मध्ये केला.
"मला चांगली नोकरी लागत नसल्यामुळे पाहिजे तसे यश प्राप्त झाले नाही. तुम्ही सकाळी येऊन माझी बॉडी विहिरीतून काढून घ्या" असं रामरतनने मेसेजमध्ये लिहिलेले होते. त्यामुळे सुधीर टिकार आणि त्याच्या काकांनी अटाळी शिवारातील विहिरीवर जाऊन पाहिले असता रामरतनने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. रामरतन आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी खामगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस सर्व अंगलने तपास करत आहेत.
