20 हून अधिक माकडांचा हल्ला
रामनाथ चौधरी हे सकाळी त्यांच्या जनावरांसाठी शेतात चारा गोळा करत असताना 20 हून अधिक माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे चौधरी यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही. लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली, पण तोपर्यंत ते गंभीर जखमी झाले होते.
advertisement
डॉक्टरांनी मृत घोषित केलं
त्यांना तातडीने मधुबनी सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक प्रमुख रामकुमार यादव यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर, पांडौलचे सर्कल ऑफिसर पुरुषोत्तम कुमार आणि पोलिस स्टेशनचे प्रभारी मोहम्मद नदीम यांनी गावाला भेट दिली.
advertisement
माकडांना पकडण्याची विनंती
दरम्यान, गावकऱ्यांनी या प्रकरणानंतर वन विभागाला या माकडांना पकडण्याची विनंती केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर बिहारमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Location :
Bihar
First Published :
August 18, 2025 1:38 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
शेतात गेला अन् घात झाला! 20 माकडांनी शेतकऱ्याची केली भयंकर अवस्था, डॉक्टर देखील वाचवू शकले नाहीत जीव