अंकित नवाचा तरुण आपल्या प्रेयसीसह चाउमीन खायला पोहोचला होता. याठिकाणी आधीपासून असलेल्या त्याच्या 3 मित्रांनी त्याला ब्लॅकमेल केले. तसेच त्याला मारहाणही केली. नोएडाच्या सेक्टर-45 मध्ये सोम बाजारात ही घटना घडली. 6 नोव्हेंबरला ही घटना घडली असे सांगितले जात आहे.
याप्रकरणी अंकितचा भाऊ बृजमोहन याने सेक्टर 39 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत म्हटले की, करण, कल्लू उर्फ अमित आणि प्रदीप नावाच्या 3 तरुणांनी अमित आणि त्याच्या प्रेयसीचे फोटो काढले. त्यानंतर त्याला घेरले आणि त्याला आधी शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला चाउमिन खाऊ घाल किंवा दुसरी कोणती पार्टी थे नाहीतर आम्ही तुझ्या प्रेयसीबाबत तुझ्या कुटुंबीयांना सांगू, अशी धमकी दिली.
advertisement
प्रेमात धोका, लव्ह मॅरेजनंतर घडलं भयानक, तरुणीसोबत हादरवणारी घटना
यावर अंकितने विरोध केला असता आरोपींनी त्याला मारहाण सुरू केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे. या घटेनंतर त्याच्या कुटुंबीयांसोबतच स्थानिकांनीही आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे बृजमोहन यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी तिनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
