हे प्रकरण ताजं असताना आता एका नववीत शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच वर्गातील चार अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित चार मुलांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद याठिकाणी घडली. पीडित मुलगी इयत्ता नववीच्या वर्गात शिकते. घटनेच्या दिवशी रविवारी ती घरी एकटीच होती. यावेळी शाळकरी मुलांनी तिच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचार करणारी मुलं देखील तिच्याच शाळेत शिकतात.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, रविवारी पीडित मुलगी घरात एकटी होती. ती सोशल मीडियाद्वारे शाळेतील मुलाच्या संपर्कात होती. रविवारी सकाळी एक आरोपी तिच्या घरी पोहोचला. या मुलीने घराचा दरवाजा उघडताच मुख्य आरोपी मुलासह त्याचे आणखी तीन साथीदार जबरदस्तीने घरात शिरले, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्याचवेळी मुलीची आई घरी आली. तिने मुलीला घराबाहेर काढले आणि घराला बाहेरून कुलूप लावून मुलांना कोंडून ठेवले. मात्र, पोलिसांना बोलावण्यापूर्वीच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्या मुलांना सोडून दिले. आरोपी मुलंही इयत्ता नववी, दहावी, अकरावीमध्ये शिकत आहे.