फोनवर बोलता बोलता एक तरुण आणि तरुणी प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तरुण आपली वधूला घेण्यासाठी पश्चिम बंगालच्या फरक्का येथे पोहचला. मात्र, तेथे जे घडलं त्यामुळे तरुणाला मंडप सोडून पळावे लागले. त्याच्या लग्नात काय घडेल याची त्याला कल्पना नव्हती.
फरक्का पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या शामशेरगंज येथील चासकापुर गावातील एका तरुणाचे फरक्काच्या बटाला परिसरातील तरुणीसोबत काही महिन्यांपासून प्रेम संबंध होते. ते नेहमी फोनवर बोलू लागले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे रविवारी तरुण लग्नासाठी फरक्का येथे पोहोचताच त्याचे डर्टी सिक्रेटचा खुलासा झाला.
advertisement
लग्नाच्या आधी तरुणाबाबत धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे वधू आणि तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला. ही तरुणी ज्या तरुणासोबत लग्न करणार होती, त्याने आधीच अनेक तरुणींसोबत लग्न केले होते. तरुणाबाबत ही माहिती समोर येताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तेथून पळ काढला. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयाने त्याचा शोध घेत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. आता फरक्का पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
