चौकशीत आरोपीने आपलं नाव रिंकू असल्याचं उघड केलं. तो शिवपुरीचा रहिवासी असल्याचंही सांगण्यात आलं. त्याच्याकडून बनावट ओळखपत्रही सापडलं. जीआरपीने त्याला अटक केली आहे. प्लॅटफॉर्म ड्युटीवर तैनात टीसी विश्वामित्र यांना प्लॅटफॉर्म क्रमांक-4 वर टीटीई गणवेश घातलेला एक व्यक्ती दिसला. तो प्रवाशांची तिकीटं तपासत होता.
advertisement
विश्वामित्राला पाहताच तो बनावट टीसी घाबरला आणि पळून जाऊ लागला. दरम्यान, प्लॅटफॉर्मवर गस्त घालत असलेले आरपीएफचे एएसई नत्थी सिंह आणि कॉन्स्टेबल भीम सिंह यांनी तत्परता दाखवत त्याला पकडलं. विश्वामित्र यांनी लगेच जयपूर जंक्शन सीटीआय समीर शर्मा, हेड टीसी शक्ती शर्मा आणि विद्या देवी यांना याची माहिती दिली.
आयजी ज्योती कुमार सतीजा आणि कमांडंट भवप्रीत सोनी यांनी सांगितलं की, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर आरपीएफ दक्षता मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत बनावट टीटी पकडण्यात आला आहे. आरोपीकडे रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड, पश्चिम मध्य रेल्वेचे बनावट कार्ड सापडले. आरपीएफने गुन्हा दाखल करून आरोपीला जीआरपीच्या ताब्यात दिलं आहे.