नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नावरून झाला वाद
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडली. लोणी पोलीस स्टेशन परिसरातल्या मुस्तफाबाद कॉलनीतील एका वादात नवऱ्याने बायकोवर पेट्रोल टाकून तिला मारण्याचा प्रयत्न केला. आगीत भाजल्याने महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नावरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. रविवारीही याचवरून दोघांमध्ये वाद झाला. यात आरोपी नवऱ्याने बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
advertisement
जखमी अवस्थेत महिलेला ठाण्यात
या प्रकरणात, एसीपी सिद्धार्थ गौतम यांनी सांगितले की, 16 मार्च 2025 रोजी उत्तर प्रदेशातील लोणी पोलीस स्टेशन परिसरातून ही घटना उघडकीस आली आहे. लोणीच्या मुस्तफाबाद भागात एका महिलेला तिच्याच नवऱ्याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं. ही घटना सायंकाळी 5:45 च्या सुमारास घडली, जेव्हा परिसरातील लोकांनी 25 वर्षीय सादियाला गंभीर अवस्थेत लोणी पोलीस स्टेशनमध्ये आणलं.
नवऱ्याला ताबडतोब घेतलं ताब्यात
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, पीडित सादियाला तिचा नवरा आरिफने पेट्रोल टाकून पेटवून दिलं, ज्यामुळे ती गंभीररित्या भाजली. माहिती मिळताच, पोलिसांनी सादियाला तत्काळ प्रथमोपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. जिथे डॉक्टरांनी सांगितलं की पीडितेच्या शरीराचा खालचा भाग सुमारे 40 ते 45 टक्के भाजला आहे. तिची गंभीर अवस्था पाहून तिला तातडीने जीटीबी रुग्णालयात रेफर करण्यात आलं. त्याचवेळी, पीडितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती आरिफला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे.
हे ही वाचा : लाज सोडली! बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार, दीड वर्षांपासून सुरू होतं विकृत कृत्य
हे ही वाचा : मुंबई विमानतळावरील धक्कादायक प्रकार, शौचालयात सापडले 2.53 कोटींचे घबाड; कचऱ्यात लपवलेली गुपिते बाहेर
