लाज सोडली! बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार, दीड वर्षांपासून सुरू होतं विकृत कृत्य
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका नराधमाने बापाने आपल्या पोटच्या मुलीवर विकृतीचा कळस गाठला आहे. आरोपीनं वारंवार पीडित मुलीच्या शरीराचे लचके तोडले आहेत. मागील दीड वर्षांपासून बापच मुलीचं लैंगिक शोषण करत होता. या लैंगिक संबंधातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अत्याचाराची उकल होताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा अधिक तबास जलंब पोलीस करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
बुलढाणा जिल्ह्यात सख्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. दीड वर्षांपूर्वी जलंब पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने अज्ञात आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीवर अत्याचार कुणी केला? याची काहीच उकल होत नव्हती. अखेर या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठी अपडेट लागली.
advertisement
अल्पवयीन मुलीला 28 आठवड्यांची गर्भवती करणारा दुसरा तिसरा कुणी नाही, तर पीडितेचा सख्खा बापाच निघाला आहे. आरोपी मागील अनेक महिन्यांपासून अत्याचार करत असल्याचं डीएनए रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. शिवाय मुलीच्या पोटात वाढणारं बाळ आरोपी बापाचेच असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी जलंब पोलीस तातडीची पावलं उचलत नराधम आरोपी बापाला अटक केली आहे. त्या धक्कादायक प्रकाराने समाजमन सुन्न झालं आहे.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
March 17, 2025 1:51 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
लाज सोडली! बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार, दीड वर्षांपासून सुरू होतं विकृत कृत्य


