प्रेम की विश्वासघात?
सुरेंद्र आणि पूजाचं लग्न पाच वर्षांपूर्वी झालं होतं. मुलगाही झाला, संसार सुखी वाटत होता. पण आडोशाला सुरू झालेलं एक नातं हळूहळू या घराचा अंत करणारं ठरलं, ज्याची कल्पना नात्याच्या सुरुवातीला कोणालाच नव्हती.
नवरा कामासाठी बाहेर असताना पूजाचं तिचा नातेवाईक सोनूशी गुप्त संबंध सुरू झाला. सोनू विवाहित होता आणि तो सुरेंद्रचा चुलत भाऊ होता. सोनू विवाहित असूनही या नात्यात गुंतला.
advertisement
जेव्हा सुरेंद्रला या दोघांच्या नात्याबद्दल कळालं तेव्हा सोनू आणि पूजानं ठरवलं की आता काहीपण करुन त्यालाचा काटा कायमचा काढायचा.
मग सुरू झाला हत्येचा खेळ
27 मार्चची ती रात्र. सोनूने सुरेंद्रला शेतात बोलावलं. कारचा नंबर कपड्याने झाकला, जेणेकरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कार ओळखली जाऊ नये. सुरेंद्रला दारू पाजली, आणि तो बेशुद्ध होताच इलेक्ट्रिक मोटरच्या तारांनी करंट देऊन त्याचा जीव घेतला.
सोनूने सुरेंद्रचा मृतदेह कारमध्ये टाकला. पूजा घरात वाट पाहत होती. दोघांनी मिळून शव बेडवर ठेवला आणि सुरेंद्र झोपल्याचा अभिनय रचला. सकाळी पूजा रडत बाहेर आली आणि म्हणाली “सुरेंद्र हलत नाही… त्याला छातीत दुखत होतं” सर्वांना वाटलं – हृदयविकाराचा झटका. आणि अंत्यविधी पार पडले.
काही दिवसांनी, शेतात सुरेंद्रच्या सख्या भावाला त्याची चप्पल सापडली. तिथे टायरच्या खुणा आणि ओढल्याचे ठसे दिसले. त्यावेळी मात्र संशय दाटला. सीसीटीव्ही पाहिले तर कार शेतात जाताना दिसली, पण तिथून कार परतताना दिसली नाही. यानंतर सुरंद्रेच्या सख्याभावाचा संशय बळावला आणि त्याने पोलिसात तक्रार दाखल केली.
परिवाराच्या शंकेवरून तपास सुरू झाला. सत्य उघड होताच पूजाला सगळं सहन झालं नाही. 15 एप्रिलला तिने विष घेऊन आयुष्य संपवलं. सोनू मात्र पळून गेला. गावकऱ्यांच्या दबावाला आणि नालस्तीला कंटाळून, 22 एप्रिलला सोनूच्या आईनेही आत्महत्या केली.
एका चुकीच्या नात्यामुळे, एक अवैध प्रेम… आणि त्याचा शेवट तीन मृतदेहांत झाला. यामध्ये उगाच चुक नसताना दोन बळी गेली.