अशी आखली होती हत्येची योजना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन आरोपीने हत्येसाठी कागदावर योजना तयार केली होती. चोरी कशी करायची आणि जर कोणी अडथळा आणला तर ‘प्लॅन बी’ नुसार त्याला कसे मारायचे, हे त्याने लिहिले होते. चोरी करताना कोणी पाहिले तर त्याला मारण्यासाठी सोबत चाकूही ठेवला होता. याच चाकूचा वापर करून त्याने मुलीची हत्या केली.
advertisement
80,000 रुपये चोरले
सीसीटीव्हीच्या नजरेतून वाचण्यासाठी त्याने एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत उड्या मारून खाली उतरण्याची योजना आखली होती. तो याआधीही मुलीच्या घरी आला होता, त्यामुळे त्याला घरात पूजा करण्याच्या ठिकाणी पैसे ठेवलेले असतात हे माहीत होते. त्याने घरातून 80,000 रुपये चोरले.
चोरी करताना मुलीने पाहिले आणि घडले हत्याकांड
चोरी करताना घरात कोणीही नाही असे त्याला वाटले होते. मात्र, अचानक सहस्रा बाथरूममधून बाहेर आली आणि तिने त्याला चोरी करताना पाहिले. तिने 'मी बाबांना सांगेल' अशी धमकी दिल्यानंतर तो घाबरला आणि त्याने ‘प्लॅन बी’ अंमलात आणला. त्याने आधी सहस्राचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चाकूने तिच्या गळ्यावर आणि पोटात 18 वेळा वार केले. मुलीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावरच तो तिथून पळून गेला.
शाळेला सुट्टी असल्यामुळे घरी एकटीच
घरी परतल्यावर त्याने रक्ताने माखलेले कपडे आणि चाकू घरात लपवून ठेवले. पोलिसांनी आरोपीच्या आईसमोर घरात झडती घेतली असता, त्यांना ते सर्व साहित्य सापडले. मुलीचे वडील मेकॅनिक असून, आई नर्सिंग होममध्ये काम करते. हत्येच्या दिवशी मुलगी शाळेला सुट्टी असल्यामुळे घरी एकटीच होती.
क्राईम शो पाहून मिळाली प्रेरणा
पोलिसांच्या चौकशीत असे समोर आले आहे की, आरोपीची आई एक लहान किराणा दुकान चालवते आणि त्याचे वडील दारूच्या व्यसनामुळे घराकडे दुर्लक्ष करतात. हा अल्पवयीन मुलगा नियमित शाळेत जात असला तरी तो चुकीच्या मार्गावर होता. ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर क्राईमशी संबंधित कंटेट पाहून त्याला चोरी आणि हत्येची कल्पना सुचली. त्याला आवडणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी आईकडून पैसे मिळत नसल्यामुळे त्याने चोरी करण्याचा मार्ग निवडला, असेही पोलिसांनी सांगितले.