या घटनेत विवाहित महिलेची सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून हत्या केली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील बोंडरपाडा येथे ही घटना घडली. यात रंजना शिवा भवर नावाच्या महिलेची सासरच्या मंडळींनी हत्या केली.
Nanded Crime : आधी पलंगावर पत्नीचा गळा आवळला; नंतर स्वतः उचललं धक्कादायक पाऊल, नांदेड हादरलं
advertisement
मृत महिलेचं वय 27 वर्षे होतं. सासरकडील लोकांनी रंजना हिची रात्री 12 वाजेच्या सुमारास हत्या केली आहे. सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बंदुकीने गोळ्या घालून तिचा जीव घेतला. घटनेची माहिती मिळताच मृत महिला रंजना भवर हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमी महिलेला खर्डी येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे नेलं असता येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. आता महिलेचा मृतदेह मुंबई येथील जे.जे. रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात सासरच्या 6 जणांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात हत्यचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खर्डी आणि शहापूर पोलीस करत आहेत.
