TRENDING:

बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोणत्या देशात काय शिक्षा? तुम्हाला माहितीय का?

Last Updated:

या देशांतील शिक्षांमुळे बलात्काऱ्यांचा उडतो थरकाप; कोणत्या देशात काय आहे शिक्षा, जाणून घ्या अधिक

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गेले काही दिवस देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये बलात्काराच्या अमानुष घटना समोर येत आहेत. कोलकातामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. त्यापाठोपाठ उत्तराखंडमध्ये एका परिचारिकेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची बातमी आली. महाराष्ट्रात बदलापूरमध्ये एका साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांतून संतापाची लाट उसळली. या सर्व प्रकरणांतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. बलात्कारांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालावेत आणि आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवलं जावं अशी मागणी नागरिक करत आहेत.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

दुसरीकडे कोलकात्यातील आर. जी. कर मेडिकल कॉलेज ॲंड हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ ज्युनिअर डॉक्टर आंदोलन करत आहेत. कोलकाता पोलिसांनी लॉकेट चॅटर्जीसह तिघांना चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश दिले आहेत. या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी देशभरातून केली जात आहे.

त्यामुळेच कठोरात कठोर शिक्षा काय असावी याची चर्चा होत आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोणत्या देशात काय शिक्षा दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? भारतासह इतर अनेक देशांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहे, जाणून घेऊ या.

advertisement

दक्षिण कोरिया हा देश तेथील नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी ओळखला जातो. या देशात बलात्कार करणाऱ्याला कोणतीही माफी मिळत नाही. सुरक्षा दलांकडून गोळ्या झाडून त्याला ठार मारलं जातं.

सौदी अरेबियामध्ये बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाते. बलात्कार करणाऱ्या पुरुषाला जनतेसमोर उभं करुन त्याचा शिरच्छेद केला जातो.

बलात्कार करणाऱ्याला चीनमध्ये थेट मृत्यूदंडाची शिक्षा आहे. बलात्काराच्या काही गुन्ह्यांमध्ये दोषी पुरुषाचं गुप्तांग कापण्याची शिक्षाही केली जाते.

advertisement

नेदरलॅंड या देशात परस्परांच्या परवानगीशिवाय किस करणंही अपराध मानला जातो. असं करणाऱ्यांना चार ते 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

इराकमध्येही बलात्कार करणाऱ्या पुरुषांना कठोर शिक्षा केली जाते. बलात्कार करणाऱ्या पुरुषाचा जीव जाईपर्यंत त्याला दगडाने ठेचून मारलं जातं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर जर्मनीत, लवकरच होतोय खास सोहळा, तुम्हालाही वाटेल अभिमान
सर्व पहा

भारतात जुन्या भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि 375 अंतर्गत बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा करण्याची तरतूद आहे. मृत्युदंड, जन्मठेप आणि किमान पाच वर्षे तर कमाल 10 वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोणत्या देशात काय शिक्षा? तुम्हाला माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल