नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रीती (३५) ही विवाहित असून ती कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील होसाकोप्पलु गावची रहिवासी होती. तिला मारणारा प्रियकर तरुण मंड्या जिल्ह्यातील रहिवासी आहे. हत्येच्या चार दिवस आधी दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. आरोपीनं पाचव्या दिवशी एकमेकांना भेटले. यानंतर, पुनीतने प्रीतीची हत्या केली आणि तीचा मृतदेह शेतात पुरला. दरम्यान, महिलेच्या पतीने सोमवारी हसनमधील पोलिसांकडे प्रीती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
advertisement
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, मंड्या येथील एका शेतात महिलेचा मृतदेह आढळून आला. मंड्या पोलीस अधीक्षकांनी ही दिलेल्या माहितीनुसार पुनीत आणि प्रीती चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भेटले होते. रविवारी दोघांची भेट झाली आणि शारीरिक संबंधावरून वाद झाल्याने पुनीतने प्रीतीवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. हत्या केल्यानंतर आरोपी पुनीतने महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले आणि तिचा मृतदेह करोती गावातील त्याच्या शेतात पुरला. त्यामुळे हत्येचं नेमकं कारण काय होतं? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
मोबाईल नेटवर्कवरून आरोपीला बेड्या
हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेचे मोबाईल नेटवर्क ट्रेस केले. ती कुठे फिरत होती याचा मार्ग पोलिसांनी शोधून काढला. यानंतर सोशल मीडियावर चॅट आणि कॉल डिटेलच्या आधारे पोलिसांनी पुनीतला ताब्यात घेतलं. आरोपी पुनीतची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अवघ्या चार दिवसांपूर्वी ओळख झालेल्या तरुणाने अशाप्रकारे विवाहित महिलेची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.