TRENDING:

मुलगा आहे की मुलगी? पाहण्यासाठी पतीनं पत्नीचं पोट विळ्यानं फाडलं, विकृत माणसाला अखेर...

Last Updated:

आजही असे अनेक लोक आहेत ज्यांना मुलं हवी असतात. मुली जन्माला आलेल्या त्यांना योग्य वाटत नाही. मुलगा हवा यासाठी ते काहीही करायला तयार असतात. मुलाच्या हव्यासापोटी अनेकदा धक्कादायक घटनाही घडल्याच्या समोर आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आजही असे अनेक लोक आहेत ज्यांना मुलं हवी असतात. मुली जन्माला आलेल्या त्यांना योग्य वाटत नाही. मुलगा हवा यासाठी ते काहीही करायला तयार असतात. मुलाच्या हव्यासापोटी अनेकदा धक्कादायक घटनाही घडल्याच्या समोर आल्या आहेत. जुन्या काळी अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडत होत्या. मात्र आजच्या काळातही असे लोक आहेत जे मुलासाठी काहीही करतात. अशीच एक हृदयद्रावर घटना महिलेसोबत घडली होती.
मुलगा आहे की मुलगी? पाहण्यासाठी पतीनं पत्नीचं पोट विळ्यानं फाडलं
मुलगा आहे की मुलगी? पाहण्यासाठी पतीनं पत्नीचं पोट विळ्यानं फाडलं
advertisement

महिलेनं पाच मुलींना जन्म दिला होता आणि यावेळी ती सहाव्यांदा प्रेग्नंट होती. यावेळीही मुलही होऊ नये असं तिच्या नवऱ्याला वाटत होतं. तो याविषयी खूप विचार करायचा. मुलगा असेल की मुलगी या विचारानं तो वेडा झाला. यातच त्यानं बायकोच्या पोटात मुलगा आहे की मुलगी हे पाहण्यासाठी बायकोचं पोटच फाडलं. महिलेच्या पोटात मुलगाच होता मात्र या व्यक्तीच्या भयानक कृत्यानं त्याचा जीव गेला.

advertisement

पत्नी गर्भवती असल्याचं समजताच नाराज झाला पती; मिरची विकून घेतला पिस्तूल अन् निर्घृण हत्या

पत्नीचं पोट विळ्यानं फाडणाऱ्या या नराधमाला न्यायालयानं जन्मठेप सुनावली. याशिवाय त्याला 50 हजार रुपयांचा दंडही सुनावला. पोटातील सहावे अपत्य मुलगा की मुलगी हे पाहण्यासाठी दारूच्या नशेत असलेल्या नवऱ्याने पत्नीशी भांडण करून विळ्याने पोट फाडले. पोट फाटल्याने पोटातील बाळ मरण पावले.

advertisement

दरम्यान, या आधुनिक जगातही असे अनेक लोक आहेत जे मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव करतात. त्यांना वंशाचा दिवाच हवा असतो. ते नाह मिळाल्यावर ते कोणतंही धक्कादायक पाऊल उचलतात.

मराठी बातम्या/क्राइम/
मुलगा आहे की मुलगी? पाहण्यासाठी पतीनं पत्नीचं पोट विळ्यानं फाडलं, विकृत माणसाला अखेर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल