खुन्नस देण्यावरून झाला खून
या हल्ल्यानंतर तिन्ही संशयित आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले. त्यापैकी दोघे अल्पवयीन आहेत. सुरुवातीला यामागे आर्थिक वाद असल्याची चर्चा होती, परंतु पोलिसांनी केलेल्या चौकशीतून एकमेकांना 'खुन्नस' देण्याच्या जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.
दोन अल्पवयीन मुलांविरूद्ध गुन्हा दाखल
मृत गुंडाचे नाव रोहित पंडित पवार (वय २३, रा. बेचर वसाहत, इस्लामपूर) असे आहे. ओमकार राजेंद्र गुरव (इस्लामपूर) याने या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हौसेराव कुमार आंबी (वय २१, रा. हुबालवाडी, ता. वाळवा) आणि दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
एक अट्टल गुडांची झाली हत्या
मृत रोहित पवार हा एक अट्टल गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती होता. त्याच्यावर यापूर्वीच पाच गंभीर गुन्हे दाखल होते. पैशांच्या कारणावरून तो अनेकांना त्रास देत असे. हल्लेखोरांसोबत त्याचे जुने वैर होते आणि तो त्यांना नेहमीच डिवचत असे, ज्यामुळे त्यांच्यात धुसफुस सुरू होती. यातूनच हल्लेखोर रोहितच्या मागावर होते. शुक्रवारी दुपारी तो कारखाना रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच हल्लेखोरांनी त्याला गाठले. कोणताही विचार न करता त्यांनी धारदार शस्त्रांनी त्याच्या मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले आणि तिथून पळ काढला. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे रोहितचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने इस्लामपूरमध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा : पैशांसाठी जावयाचा छळ! सासरच्या जाचाला कंटाळून धावत्या रेल्वेखाली घेतली उडी, तिघांविरुद्ध गुन्हा!
हे ही वाचा : 2800 रुपयांची चूक अन् आईचा ओरडा, 7वीमधल्या मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा शेवट