2800 रुपयांची चूक अन् आईचा ओरडा, 7वीमधल्या मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा शेवट
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
2800 रुपयांची एक चूक आणि आईचा ओरडा यामुळे 7वी मध्ये शिकणाऱ्या 13 वर्षांच्या मुलाचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
'फ्री फायर' या ऑनलाइन गेममध्ये पैसै गमावल्यानंतर सातवीमधल्या मुलाने जीवन संपवलं आहे. फ्री फायरमध्ये 2800 रुपये गमावल्यानंतर पालक ओरडतील, या भीतीने 13 वर्षांच्या मुलाने गळफास लावून घेतला आहे. गुरूवारी रात्री इंदूर शहरातील एमआयजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनुराग नगर येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
सातवीमध्ये शिकत असलेल्या या मुलाला ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या आजोबांनी त्याला छतावरच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये पाहिले. त्यानतंर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात पोहोचले आणि मुलाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला.
शुक्रवारी पोलिसांनी मृत मुलाच्या घरी पोहोचून पालकांची आणि कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी केली. मुलगा फ्री फायर गेम खेळत होता, ज्यात त्याने 2800 रुपये गमावल्याचं पालकांनी पोलिसांना सांगितलं. मुलाने त्याचा फोन वाय-फाय द्वारे कनेक्ट केला होता आणि आईचे डेबिट कार्ड त्याच्या ऑनलाइन गेमिंग आयडीसोबत लिंक केले होते, असं एमआयजी पोलीस स्टेशनचे प्रभारी सी.बी.सिंग यांनी सांगितलं.
advertisement
फ्री फायर गेममध्ये 2800 रुपये गमावल्यानंतर मुलाने आईला फोन केला, तेव्हा आई त्याला ओरडली. यानंतर मुलगा त्याच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये गेला आणि त्याने दरवाजा आतून बंद केला. दरवाजा बंद केल्यानंतर मुलाने पंख्याला लटकून टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
याआधीही 2022 मध्ये फ्री फायर या ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे 2022 साली भोपाळमध्ये एका 11 वर्षांच्या मुलाने जीवन संपवलं होतं. यानंतर मध्य प्रदेश सरकारचे तत्कालीन गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी घोषणा केली होती की सरकार ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन कायदा आणेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2025 9:46 PM IST