ShaniDev: ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच शनिदेव पावणार! 27 वर्षांनी गुरुच्या नक्षत्रात एंट्री; 3 राशींना अर्थलाभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
ShaniDev: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला दंडाधिकारी आणि कर्मफळदाता मानले जाते. तसेच, शनिदेवाला वय, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज तेल, कर्मचारी, नोकर, तुरुंग इत्यादींचा कारक मानले जाते. म्हणजेच, शनिदेवाचे या क्षेत्रांवर वर्चस्व असते. जेव्हा जेव्हा शनिदेवाच्या चालीत बदल होतो. तेव्हा या क्षेत्रांवर विशेष परिणाम होतो.
advertisement
मिथुन रास - तुमच्यासाठी, शनिदेवाच्या नक्षत्रातील बदल फायदेशीर ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीपासून करिअर आणि व्यवसायाच्या ठिकाणी संक्रमण करत आहेत. यावेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. या काळात नवीन भागीदारी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात आत्मविश्वास वाढेल, करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. वरिष्ठ कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे कदर करतील. व्यावसायिकांना चांगले पैसे मिळू शकतात.
advertisement
कुंभ - शनिदेवाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात संक्रमण करत आहेत. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. यासोबतच, तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही, सगळीकडून नफा मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला वेळोवेळी अचानक पैसे मिळू शकतात. तसेच, या काळात, तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
advertisement
advertisement
मकर राशीच्या लोकांना या काळात भावंडांचा पाठिंबा मिळू शकेल. या काळात तुम्ही खूप प्रवास कराल आणि हे प्रवास फायदेशीर ठरतील. कौटुंबिक जीवनात सुधारणा दिसून येईल. या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)