रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे 20) असं आत्महत्या पावलेल्या दोघांची नावं आहेत. मयत रामचंद्र हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. तर रुपाली ही आंबोली येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. दोघांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. याबाबतची एक सुसाईड नोटही पोलिसांच्या हाती लागली आहे. रामचंद्र पारधी यांनी आत्महत्या का केली, याचा सविस्तर खुलासा सुसाईड नोटमध्ये केला आहे. त्यांनी आपल्या पत्नीसह तिच्या घरच्यांविरोधात गंभीर आरोपही केले आहेत.
advertisement
सुसाईड नोटमध्ये नक्की काय म्हटलं?
रामचंद्र पारधी यांनी मृत्यूआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी, तिच्या चुलत बहिणी, त्यांचे पती एकूण ११ जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीत म्हटलं आहे. या सर्वांनी आपल्याला मानसिक त्रास दिला. यामुळे जगण्याची इच्छा नसल्याचंही रामचंद्र यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं. तसेच त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. पत्नी लायकीची नाही. ती घरातील सर्व बाबी फोन करून आणि प्रत्यक्षात इतरांना सांगते. आपण किती चांगलं आणि नवरा कसा वाईट आहे, असं ती नातेवाईकांना सांगत असे. तिने माझी नातेवाईकांमध्ये बदनामी केली. मी आठ वर्षे सगळं सहन केलं.
पतीचं तिच्या गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिने आपल्याला कधीच मानसिक आणि शारीरिक सुख दिलं नाही, असा आरोप चिठ्ठीत केला आहे. पत्नीने आणि तिच्या नातेवाईकांनी केलेल्या बदनामीमुळे जगण्याची इच्छा नाही. माझ्या मृत्यूस सर्वांना जबाबदार धरून कठोर कारवाई करा, असंही रामचंद्र पारधी यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं. या नोटमध्ये त्यांनी आई वडील, बहीण-भाऊ आणि मुलांची माफी मागितली आहे.