कॉन्स्टेबलचा मृतदेह फासावर
श्यामाजीपुरम येथे एका चार मजली घरात कॉन्स्टेबल मान महेंद्र भाड्याने राहत होते. कल्याणपूर पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर इतेंद्र कुमारही त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होते. मंगळवारी सकाळी इन्स्पेक्टर इतेंद्र हेल्मेट घेण्यासाठी कॉन्स्टेबलच्या खोलीत गेले. मात्र, वारंवार ठोठावूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावले तेव्हा कॉन्स्टेबलचा मृतदेह फासावर लटकलेला दिसला.
advertisement
प्रिय बायको, तू प्रत्येक परिस्थितीत...
सुसाईड नोटमध्ये महेंद्रने त्याच्या पत्नीला लिहिलं, "प्रिय बायको, तू प्रत्येक परिस्थितीत माझ्यासोबत उभी राहिलीस, म्हणून मी तुझ्यासाठी काहीही लिहिणार नाही. हे घर तुझं आहे आणि तुझ्या पालकांचं घरही आहे. तू जिथं असशील तिथं आनंदाने राहा. पण काहीतरी कमी असेल आणि म्हणूनच मी हे जग सोडून जात आहे. माझ्या प्रिये, तू प्रेमाच्या काही ओळी बोलू शकली असती. हे लहान वय आहे, लग्न कर... आज, मी माझ्या वेळेपूर्वी जात आहे, असं महेंद्रने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
मी मरेन तेव्हा मी हसत मरेन कारण....
आत्महत्येच्या सुमारे 13 तास आधी, कॉन्स्टेबलने इन्टाग्रामच्या स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात तो म्हणतो, "मृत्यूनंतरही स्थिती कायम राहते.. लोक पायावर चालतील, पण आपल्याला खांद्यावर घेऊन जातील. जेव्हा मी मरेन तेव्हा मी हसत मरेन कारण मी जिवंत असताना खूप रडलो आहे, असं कॉन्सटेबल सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणाला आहे.
