नवऱ्याला पुलाच्या कडेवर नेलं अन्...
बायको माहेरी गेली होती. तिला सासरी परत आणायला नवरा गेला. बायकोला घेऊन येत असताना बायकोच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं. बायकोने गाडी थांबावायला सांगितली अन् फोटो काढायला लावले. त्यावेळी तिच्या डोक्यात नवऱ्याला संपवण्याचा प्लॅन सुरू होता. तिने सेल्फी घेण्यासाठी नवऱ्याला पुलाच्या कडेवर उभा केलं अन् नदीवरून धक्का दिला.
advertisement
नदीत दोरखंड फेकले, कमरेला बांधलं
नवरा पाण्यात गेला अन् तिला वाटल्यानंतर ती घरी गेली अन् नवरा पाण्यात गेला, असं सांगून टाहो फोडला. पण इतकं नवऱ्याचं नशिब चांगलं होतं. नवऱ्याने दगडांचा आधार घेत एका मोठ्या खडकावर पोहोचला. तिथून त्याने लोकांना आवाज देत मदतीची मागणी केली. लोकांनी धावत त्याची मदत केली. नदीत दोरखंड फेकले अन् कमरेला बांधून त्याला बाहेर काढलं. त्याचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पत्नीविरुद्ध पोलिसात तक्रार
व्हिडिओमध्ये काही लोक नदीत दोरखंड फेकताना दिसत आहेत. तो माणूस निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. तो नदीच्या मधोमध एका खडकाला पकडून बसला होता. मात्र, घरी गेल्यावर महिलेने कुटुंबाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तिनं सांगितलं की तिचा पती चुकून घसरला. घरी गेल्यावर महिलेने कुटुंबाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तिने सांगितले की तिचा पती चुकून घसरला. या प्रकरणानंतर आता नवऱ्याने पत्नीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.